शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

बुकी अनिल जयसिंघानीचा जामीन न्यायालयाने फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2023 07:44 IST

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नीला लाच व खंडणी देण्याचा प्रयत्न

लाेकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच व खंडणी देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी असलेला बुकी अनिल जयसिंघानी याचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने शनिवारी फेटाळला. या गुन्ह्यातील सहआरोपी व मुलगी अनिक्षा जयसिंघानी हिचा जामीन अर्ज मंजूर केल्याने आपलीही जामिनावर सुटका करावी, अशी विनंती अनिल जयसिंघानी याने न्यायालयाला केली होती.

सरकारी वकील अजय मिसार यांनी जयसिंघानीच्या जामीन अर्जाला विरोध केला. संपूर्ण कट अनिल जयसिंघानीसाठी रचण्यात आला होता. वडिलांना गुन्ह्यांतून सोडवण्यासाठी अनिक्षाने लाच देण्याचा व त्यानंतर ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार अमृता फडणवीस यांनी मलबार पोलिस ठाण्यात नोंदविली. एका आरोपीला जामीन दिल्याने दुसऱ्या आरोपीला जामीन देणे आवश्यक नाही. त्याची गुन्ह्यातील भूमिका लक्षात घेतली पाहिजे.

अनिल जयसिंघानीवर नोंदविलेल्या अनेक गुन्ह्यांत तो फरारी आरोपी आहे. आताही जामीन मंजूर केल्यास तो फरारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही,  असे मिसार यांनी न्यायालयाला सांगितले.

 

टॅग्स :Amruta Fadnavisअमृता फडणवीसCourtन्यायालय