शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खामगावचा बोगस डॉक्टर नांदुर्यात अडकला जाळ्यात, अपर पोलीस अधिक्षक पथकाची धाडसी कारवाई!

By अनिल गवई | Updated: December 17, 2023 16:30 IST

डॉक्टरविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून रोख आणि मुद्देमाल असा एकुण एक लाख ६८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

बुलढाणा: खामगाव तालुक्यातील एका बोगस डॉक्टरला नांदुरा येथील एका हॉटेलात औषधोपचार आणि रूग्णांची तपासणी करताना रंगेहात पकडण्यात आले. अपर पोलीस अधिक्षकांच्या पथकाने पाळत ठेऊन ही धाडसी कारवाई केली. यात डॉक्टरविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून रोख आणि मुद्देमाल असा एकुण एक लाख ६८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, खामगाव तालुक्यातील अंबिकापूर चितोडा येथील शेख युसुफ शेख शौकत हा नांदुरा येथील एका हॉटेलात कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी प्राप्त नसताना औषधोपचार आणि रूग्ण तपासणी करीत असल्याची गुप्त माहिती अपर पोलीस अधिक्षकांना मिळाली. या माहितीची खात्री पटल्यानंतर आरोपी डॉक्टरविरोधात अपर पोलीस अधिक्षक पथकाने सापळा रचला. 

दरम्यान, शनिवारी नांदुरा येथील हॉटेल दीपकमध्ये छापा मारला असता आरोपी डॉ. शे. युसफु हा रूग्णांना विविध औषधी देताना आढळून आला. त्याच्या जवळून विविध प्रकारची द्रव आणि भुकटी स्वरूपातील ६४ हजार रूपयांची औषधी (प्रत्येकी ३२०० रूपये किंमतीचे ३० बॉक्स),  दोन हजार रूपयांची भुकटी स्वरूपातील औषधी तसेच इतर औषधी, रोख २८०० रूपये, एक लाख रूपये किंमतीची एमएच ०२ सीएच १७२९ या क्रमांकाची जुनी चारचाकी कार असा एकुण एक लाख ६८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

आरोपी  विरोधात नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. ल.अ. जयस्वाल यांच्या तक्रारीवरून  वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम १९६१ कलम ३३,३८ वैद्यकीय व्यावसायीक अधिनीयम २००० चे कलम ३३ (१), तसेच औषधी द्रव्ये, तिलस्मी उपचार (आक्षेपार्ह जाहीराती) अधिनीयम १९५४ चे कलम ४ आणि ७ अन्वये नांदुरा पोलीसांत रविवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला. अपर पोलीस अधिक्षक अशाेक थोरात यांच्या मार्गदर्शनात एपीआय सतीश आडे, श्रीकृष्ण नारखेडे, शिवशंकर वायाळ यांनी ही कारवाई केली. 

आक्षेपार्ह दस्तवेजही जप्तआरोपी डॉ. शेख युसुफ शेख शौकत यांच्याकडून इंडियन कौन्सील ॲन्ड बी होमिओपॅथी सिस्टीम ऑफ एमईडी असे हेडींग असलेले प्रमाणपत्र क्रमांक १००७ व रजिस्ट्रेशन दिनांक ३० एप्रिल १९९४ रजीस्ट्रशन नंबर १२४७०/१९८८ आढळले. त्याच्या आधारकार्डावर ०२ जून १९७८ अशी जन्मतारीख आढळून आली. त्यामुळे जन्म तारीख आणि प्रमाणपत्रावरील तारीख यावरून त्याने केवळ १६ वर्षांचा असताना प्रमाणपत्र मिळवल्याचे आढळले. त्यामुळे पोलीसांचा संशय बळावला. 

मुळप्रमाणपत्र देण्यास नकार आरोपी डॉक्टर मान्यता प्राप्त असलेल्या विद्यापिठाच्या सुचिमध्ये नमुद असलेल्या विद्यापिठाचे कोणत्याही प्रकारची नोंदणी व वैद्यकीय अर्हता प्रमाणपत्र नसुन शासनाचा औषध विक्रीचा कोणताही परवाना नसल्याचेही पोलीस तपासात आढळून आले. त्याचवेळी आरोपीने यावेळी मुळप्रमाणपत्र देण्यास स्पष्ट नकार दिल्याचे पोलीस सुत्रांचे म्हणणे आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी