शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कौशल्य विकास प्रशिक्षण निधी लाटण्यासाठी बोगस केंद्र; बीडच्या १० संस्थांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 15:31 IST

अधिकृत संस्थांना शासनाकडून प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १५ हजार रुपयांचा निधी दिला जातो.

ठळक मुद्देविकास प्रशिक्षण संस्था कागदावरच

- मनीषा म्हात्रे

मुंबई/बीड : राज्य शासनाचा कौशल्य विकास प्रशिक्षण निधी लाटण्यासाठी बीडमध्ये कंत्राटी अधिकाऱ्याला हाताशी धरून १० बोगस प्रशिक्षण संस्था थाटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानुसार, संबंधित संस्थांविरुद्ध महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मुंबईचे संतोष  राऊत (३८) यांच्या तक्रारीवरुन सोमवारी आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी ही जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता विकास केंद्रांमार्फत शासनाच्या सर्व कौशल्य विकास योजना पार पाडत असते. या सर्व कामात महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता विकास केंदे्र ही ‘महास्वयम’ या शासकीय पोर्टलवरुन जोडण्यात आली आहे. सदरचे पोर्टल हे सिल्वर टच या संस्थेद्वारे बनविण्यात आले असून त्याचे समायोजन देखील त्यांच्याकडून करण्यात येते. या पोर्टलद्वारे सदर योजनांचा लाभ घेणाऱ्या सर्व खासगी तसेच शासकीय संस्था या नोंदणी करत असतात. नोंदणी झाल्यानंतर अधिकृत संस्थांना शासनाकडून प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १५ हजार रुपयांचा निधी दिला जातो. हाच निधी लाटण्यासाठी बीडमधील १० संस्थांनी पोर्टलच्या कंत्राटदारास हाताशी धरून बनावट केंद्र उघडली. 

शासकीय संकेतस्थळावरूनच त्यांना मान्यता देण्यात आल्याचे समोर येताच, संकेतस्थळाची जबाबदारी सोपविलेल्या सिल्वर टचकडे चौकशी केली. त्यातून, ४ नोव्हेंबर २०१८ रोजी हा व्यवहार केल्याचे समोर आले. सुट्टीच्या दिवशीच कंत्राटी कौशल्य विकास अधिकारी २  तौसीफ शेख यांचे लाँग ईन क्रेडेनशियल्सचा वापर करून  या संस्थाना मान्यता दिल्याचे सिल्वर टचकडून सांगण्यात आले. याबाबतचा अहवाल कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे अप्पर मुख्य सचिवांकडे हा अहवाल पाठविण्यात आला. त्यानुसार,  चौकशीअंती त्यांच्या आदेशाने अखेर, राऊत यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. आझाद मैदान पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. संबंधित संस्थानी आतापर्यंत किती निधी लाटला? यात कुणा कुणाचा समावेश आहे, आदींबाबत अधिक चौकशी सुरू असल्याचे आझाद मैदान पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक (गुन्हे) रमेश यादव यांनी सांगितले.

विकास प्रशिक्षण संस्था कागदावरच३१ आॅक्टोबर रोजी राऊत यांच्याकडे अशा संस्थाच्या तपासणीबाबत सांगण्यात आले. त्यानुसार, त्यांनी १८, १९ आॅक्टोबर रोजी बीड शहर, माजलगाव व परळी येथे जात तपासणी सुरु केली. संबधित पत्त्यांवर विकास प्रशिक्षण संस्थाच अस्तित्वातच नसल्याचे समोर आले. त्यानुसार बीडमधील ग्लोबल अकडमी, विद्यासागर, सहयोग स्कील, अभिनंदन कम्प्युटर्स, नमनल स्कील अकॅडमी, प्रतिभा, यश स्किल, गॅलेक्सी, अचिवर्स, अ‍ॅपेक्स संस्थांचा यात समावेश आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीBeedबीडMumbaiमुंबई