शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

जमीन वाटणी वादातून रक्तरंजित संघर्ष; एकाच कुटुंबातील ३ जणांना कुऱ्हाडीने संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 17:44 IST

आरोपी भावाने काही गुंडासह तिथे घुसून कुटुंबाला बेदम मारहाण सुरू केली. या मारहाणीत तिघांचा मृत्यू झाला.

छत्तीसगडच्या सूरजपूर इथं जमिनीच्या वादातून ३ जणांची हत्या करण्यात आली आहे. २०-३० लोकांनी कुऱ्हाडीने, लाठीकाठीने एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला. ज्यात २ जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला होता. जखमीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले परंतु त्याने जीव सोडला. जमिनीच्या वादातून घडलेल्या या प्रकाराने परिसरात मोठी खळबळ माजली आहे.

सूरजपूरच्या डुबकापारा परिसरात एका कुटुंबाची ७ एकर जमीन होती. या जमीन वाटणीवरून भावांमध्ये वाद सुरू होता. त्यातच आज पीक लावण्यावरून दोन्ही भाऊ आणि त्यांच्या कुटुंबात हाणामारी झाली. वाद इतका विकोपाला गेला की एका भावाने कुऱ्हाडीने हल्ला केला ज्यात माधे टोप्पो यांची पत्नी आणि मुलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर माधे टोप्पो गंभीरपणे जखमी झाले होते. माधे टोप्पो यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांना तपासाला सुरुवात केली. 

तिघांची हत्या

जमिनीच्या वादातून दोन भावांच्या कुटुंबामध्ये रक्तरंजित संघर्ष झाला. यात कुटुंबातील तिघांची निर्दयीपणे हत्या करण्यात आली. मृतांमध्ये बसंती टोप्पो, नरेश टोप्पो आणि माधे टोप्पो यांचा समावेश आहे. मृत कुटुंबाने २ महिन्यापूर्वीच जिल्हा सत्र न्यायालय आणि एसडीएम कोर्टात ७ एकर जमिनीचा खटला जिंकला होता. शुक्रवारी मृत व्यक्ती कुटुंबासह शेतात पीक लावणी करण्यास आले. त्याचवेळी आरोपी भावाने काही गुंडासह तिथे घुसून कुटुंबाला बेदम मारहाण सुरू केली. या मारहाणीत तिघांचा मृत्यू झाला.

दरम्यान, या हत्याकांडानंतर कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इतक्या मोठ्या संख्येने भरदिवसा शेतात ३ जणांवर जीवघेणा हल्ला होतो ज्याची भनक पोलिसांना लागत नाही. पोलीस जर वेळीच घटनास्थळी पोहचले असते तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता असं गावकऱ्यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी