शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आपसातल्या वादात वसईच्या उमेळमान गावात रक्तपात; तरुणाच्या गळ्यावर व पोटावर मित्रानेच केले सपासप वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 05:20 IST

आरोपी मित्राची माणिकपूर पोलीस ठाण्यात शरणागती

- आशिष राणे

लोकमत न्यूज नेटवर्क

वसई : वसई विरार शहरात सध्या गोळीबाराच्या घटना ताज्या असताना आता माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमेळमान गावात दोघा मित्रांमध्ये रक्तपाताची चित्तथरारक घटना मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास घडल्याची माहिती माणिकपूर पोलिसांकडून मिळाली आहे. या घटनेत आरोपी राम यादव याने रागाच्या भरात सुरज जयस्वाल याच्यावर धारधार शस्त्राने गळयावर व पोटावर सपासप वार करीत त्यास रक्ताच्या थारोळ्यात सोडून गेला.

दरम्यान या थरारक घटनेत पीडित सुरज जयस्वाल हा गंभीर रित्या जखमी झाला असून त्याला नजीकच्या गोल्डन पार्क रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर त्याची प्रकृती चिंताजनक असून लागलीच त्याच्यावर शस्त्रक्रिया हि केली जाणार आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,सुरज व राम हे दोघेही मित्र असून त्याच्यात पूर्वी हि पैशाच्या देवाणघेवाणी मधून वाद सुरु होताच तर याआधीही हा वाद माणिकपूर पोलिसा समोर गेला होता मात्र मंगळवारी रात्री ८.३० च्या सुमारास दोघा मित्रा मध्ये पुन्हा एकदा वाद झाला असता या वादात राम ने सुरजच्या वडिलांना दूरध्वनी वरून आप के लडके का मै गला काटुंगा अशी धमकी दिली होती.

त्यामुळे वेळीच खबरदारी म्हणून हे सुरज चे कुटूंब पुन्हा माणिकपूर पोलिसात गेलं असता त्याच संधीचा फायदा घेत आरोपी राम ने सुरज याच्यावर सपासप वार करून त्यास गंभीर जखमी केलं . धक्कादायक म्हणजे राम यादव ने वार केल्यावर बराच वेळ सुरज एकाकी खितपत पडला होता मात्र त्याची स्थानिक गावकऱ्यांनी अजिबात विचारपूस ही केली नाही अखेरीस त्याच्या काही  मित्रांनी त्याची मदत करत तात्काळ त्याला गोल्डन पार्क रुग्णालयात दाखल केले. विशेष म्हणजे आरोपीने गुन्हा केल्यावर थेट माणिकपूर पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या गुन्ह्याची शरणागती पत्करली असून घडला प्रकार पोलिसांना कथन हि केला आहे 

तर रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करून आरोपीच्या अटकेची प्रक्रिया सुरु होती तर वारंवार घडणाऱ्या अशा घटनांनी मात्र वसई विरार शहरवासीय हादरून गेले आहेत