शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीर युनिव्हर्सिटीबाहेर स्फोट; दोनजण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 15:54 IST

अद्याप स्पष्ट झालेले नाही की हा ग्रेनेड स्फोट आहे की पेट्रोल स्फोट आहे. 

ठळक मुद्देप्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार हा ग्रेनेड स्फोट आहे. या स्फोटात दोनजण जखमी झाले आहेत

जम्मू - काश्मीर - श्रीनगर येथील काश्मीर युनिव्हर्सिटीबाहेर आज स्फोट झाला असून या स्फोटात दोनजण जखमी झाले आहेत. त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार हा ग्रेनेड स्फोट आहे. मात्र, तपास यंत्रणांना हे अद्याप स्पष्ट झालेले नाही की हा ग्रेनेड स्फोट आहे की पेट्रोल स्फोट आहे. 

याआधी देखील ४ नोव्हेंबरला काश्मीरमध्ये मौलाना आझाद रोडवरील लाल चौक येथील बाजारपेठेत ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात एकाच मृत्यू तर २२ जण जखमी झाले होते. तसेच २८ ऑक्टोबरला बारामुल्ला जिल्ह्यातील इक्बाल मार्केटमध्ये ग्रेनेड हल्ल्यात १९ जण जखमी झाले होते.  

काश्मीर विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर मंगळवारी हल्ला करण्यात आला. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. सैन्य आणि पोलिसांनी लगेचच शोध सुरू केला. यावेळी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला आहे. सोमवारी सायंकाळी एका दहशतवाद्यांना मारल्यानंतर सुरक्षादलांनी शोधमोहिम राबविली होती. 

मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची नावे इरफान नैरा आणि इरफान राथर अशी आहेत. नैरा यांनी 2016 आणि राथर 2017 पासून सक्रीय होता. दोन्ही दहशतवाद्यांनी याआधी भारतीय सैन्यदलांवर अनेकदा हल्ले केले आहेत. पोलिसांनी सांगितले की, सर्व परिसरामध्ये स्फोटके पेरली गेल्याची शक्यता आहे. नागरिकांनी चकमकीच्या ठिकाणी जाऊ नये, धोक्याचे ठरू शकते असा इशारा लष्कराने दिला आहे. तसेच पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

370 कलम रद्द केल्यानंतर गेल्याच महिन्यात 144 कलम हटविण्यात आले आहेत. यामुळे शाळा, कॉलेज, बाजारपेठा सुरू झाल्या आहेत. याचा फायदा दहशतवादी घेण्य़ाच्या तयारीत आहेत. या कारवायांशी दोन हात करण्यासाठी भारतीय सैन्यदलाने पॅरा, नौदल, हवाई दलाच्या अनेक तुकड्या काश्मीरमध्ये तैनात केल्या आहेत. यामध्ये हवाईदलाची गरुड फोर्सही आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरBlastस्फोट