शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात बालविवाहाचे फुटले बिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 05:27 IST

पोलिसांची सतर्कता; नवऱ्या मुलासह सहा जणांवर गुन्हा दाखल

सदानंद नाईक लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : शहरातील मोर्यानगरी येथे १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या विवाहाचे बिंग पोलिसांच्या सतर्कतेमुळे फुटले असून अल्पवयीन नवरी मुलीची रवानगी सासरऐवजी महिला बाल विभागाच्या होस्टेलमध्ये करण्यात आली. नवऱ्या मुलासह नवरीचे आई, वडील व लग्न लावून देणारा धर्मगुरू यांच्यावर बालविवाह प्रतिबंधक कायद्याप्रमाणे विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.उल्हासनगर कॅम्प नं-४ मधील मोर्यानगरी परिसरातील साई विहार रेसिडेन्सीच्या आवारात अल्पवयीन मुलीचे लग्न रविवारी दुपारी होत असल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैयालाल थोरात यांना मिळाली होती. याची गंभीर दखल घेऊन थोरात यांनी त्वरित पोलीस पथकासह लग्नमंडप गाठला. त्यांनी नवरा मुलगा व नवरी मुलीला वय विचारले असता, नवरा मुलाचे वय २७ तर  मुलीचे वय अवघे १३ वर्षांचे असल्याचे उघड झाले. या प्रकाराने पोलिसांना धक्का बसला. पोलिसांनी सर्वांना पोलीस ठाण्यात आणून नवरी बालवधूची रवानगी सासरऐवजी शहरातील महिला बाल विभागाच्या होस्टेलमध्ये केली. तर नवरा मुलगा अभिजित राजगुरू, वडील गौतम राजगुरू, आई सुनीता राजगुरू तसेच नवरी बालवधूचे वडील राहुल देवकर, आई सविता देवकर व लग्न लावून देणारे रमेश साळवे यांच्यावर बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.सुशिक्षित कुटुंबामध्ये अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याच्या घटनेचा सर्वस्तरातून निषेध व्यक्त होत आहे. लग्न लावून देणाऱ्या धर्मगुरूंनी तरी याबाबत सतर्क राहावे, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकाराने धूमधडाक्यात सुरू असलेल्या लग्न मंडपात शांततेचे सावट पसरले. तर लग्नाला आलेल्या मंडळींनी कारवाईच्या भीतीने आपापल्या घरी जाणे पसंत केले. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.