शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

शंकरनगरात बनावट ‘आयडी’ने आयपीएलवर बेटिंग

By प्रदीप भाकरे | Updated: April 9, 2023 16:21 IST

तिघांविरूध्द गुन्हा, एकाला अटक : तार झारखंडशी जुळले, राजापेठ पोलिसांची कारवाई 

अमरावती : स्थानिक शंकरनगरात बनावट आयडी वापरून चाललेली क्रिकेट बेटिंग राजापेठ पोलिसांनी उधळून लावली. ८ एप्रिल रोजी सायंकाळी पाचनंतर ही यशस्वी कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी रात्री १०.३० च्या सुमारास तिघांविरूद्ध फसवणूकीसह जुगार कायद्यानुसार गुन्हा नोंदविला. तर दिपेश राम नानवाणी (२५, रा. शंकरनगर) याला अटक केली. तर भजन मुकेश नवलानी (२१, कंवरनगर) व विशाल (रा. रायपूर, छत्तीसगढ) हे फरार आहेत. पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने ५ एप्रिल रोजी अंबिकानगर व रिंगरोडवर कारवाई करत चार सटटेबाजांना अटक केली होती. त्यानंतर तीनच दिवसात क्रिकेट बेटिंगचा हब समजल्या जाणाऱ्या शंकरनगर भागात राजापेठ पोलिसांनी ही कारवाई केली.

 आरोपी दिपेश नानवानी हा क्लासिक एक्सच ९९ नामक बेकायदा आयडीद्वारे आयपीएल क्रिकेट सामन्यावर मोबाईच्या सहाय्याने बेटिंग करत असल्याची माहिती राजापेठ पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी त्याचे घर गाठले. त्यावेळी तो राजस्थान रॉयल व दिल्ली कॅपिटल या मॅचवर लगवाडी व खयवाडी करताना आढळून आला. तो ज्या गैरकायदेशीर ॲपवर बेटिंग करताना आढळला. त्या ॲपमध्ये बॅक अर्थात खाया, एलएवाय ‘ले’ अर्थात खाया व सेशन मार्केट असे तीन पर्याय दिसून आले. त्या आयडीमध्ये ८३५० रुपये २० पैसे अशी शिल्लक दिसून आली.दिपेशने सांगितली जुगाराची पध्दत अटक आरोपी दिपेश नानवानीनुसार, पैशाची हारजित करण्याकरीता त्या आयडीमध्ये पैशाची अर्थात बॅलेन्सची आवश्यकता असते. त्याआधारे खयवाडी व लगवाडी केली जाते. ग्राहकाने पैसे दिल्यानंतर पुढील मास्टर आयडी वापरनारा इसम त्याच्या आयडीच्या खात्यावर तेवढे बॅलेन्स जमा करतो. त्यामधून तो हारजितचा खेळ खेळला, खेळविला जातो, अशी कबुली आरोपी बुकी दिपेशने दिली.

आरोपीने दिली बोगस आयडीची कबुलीती गैरकायदेशिर ‘आयडी’ आपल्याला भजन मुकेश नवलानी व रायपूर येथील विशाल नामक आरोपीने दिल्याची कबुली आरोपी दिपेश नानवानी याने दिली. सबब, आरोपी हे अवैधरित्या क्रिकेटवर बेटिंग अर्थात जुगार खेळत असून त्यापोटी शासनाकडे कुठलाही कर भरत नाहीत. त्यांनी शासनाची फसवणूक चालविली आहे. सोबतच वेगवेगळ्या बोगस आयडी तयार करुन त्या आधारे ते स्वत:च्या फायद्यासाठी लोकांची फसवणूक करताना आढळून आल्याचे राजापेठचे पोलीस अंमलदार मनीष करपे यांनी नोंदविलेल्या तक्रारीत म्हटले आहे.