शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 23:51 IST

Bengaluru Mahalakshmi Murder Case: मुक्ती रंजन रॉयचा मृतदेह ओडिशात झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला. 

Bengaluru Mahalakshmi Murder Case: बंगळुरूमधील महालक्ष्मी हत्या प्रकरणाचे गूढ अधिकच गुंतागुंतीचे होत आहे. महालक्ष्मीच्या हत्येचा ज्याच्यावर संशय होता, त्याच्याच मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात मुक्ती रंजन रॉयला संशयित आरोपी म्हणून पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र, मुक्ती रंजन रॉयचा मृतदेह ओडिशात झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला. 

महालक्ष्मीच्या हत्येनंतर संशयित मुक्ती रंजन रॉय ओडिशात लपून बसल्याचे बोलले जात होते. मुक्ती रंजन रॉयने मंगळवारी सकाळी कुळेपाडा स्मशानभूमीजवळ स्कूटरवर लॅपटॉप ठेवून गळफास लावून घेतल्याचे म्हटले जात आहेत. कुटुंबीयांनी त्याच्या मृतदेहाची ओळख पटवली असून पोलिसांनी तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.

मुक्ती रंजन रॉय हा महालक्ष्मीसोबत फॅशन फॅक्टरीत काम करत होता. काही दिवसांपूर्वी महालक्ष्मीची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे करण्यात आले आणि ते फ्रीजमध्ये ठेवण्यात आले होते. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी एक पथक ओडिशात पाठवले. या संशयित मुक्ती रंजन रॉयचा महालक्ष्मी खून प्रकरणात सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

मृतदेहाचे अनेक तुकडे काही दिवसांपूर्वी बंगळुरूमध्ये २९ वर्षीय महालक्ष्मीची हत्या करण्यात आली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे करण्यात आले आणि ते फ्रीजमध्ये ठेवण्यात आले होते. फ्रीजच्या सगळ्यात वरच्या कप्प्यात पाय होते, तर सगळ्यात खालच्या कप्प्यात मुंडकं. दरदरून घाम फोडणारे हे दृश्य बघितल्यावर घर मालकालाच नाही, तर पोलिसांनाही घाम फुटला होता. या प्रकरणाबाबत पोलिसांनी म्हटले होते की, अशी प्रकरणे वैद्यकीय तज्ज्ञांसाठीही आव्हान निर्माण करतात. कारण, त्यांच्याकडे संपूर्ण डेडबॉडी नसल्याने महालक्ष्मीची हत्या कशी झाली हे शोधणे कठीण आहे.

मुक्ती रंजन रॉयवर संशय का आला?हत्येनंतर मुक्ती रंजन रॉय आपले लोकेशन वारंवार बदलत होता. त्यामुळे पोलिसांना मुक्ती रंजन रॉयवर संशय होता. आरोपीच्या फोनवरून तो पश्चिम बंगाल आणि ओडिशा सीमेजवळ कुठेतरी लपून बसल्याचे उघड झाले होते. मात्र, पोलिस येण्यापूर्वी मुक्ती रंजन रॉय यांनी स्मशानभूमीजवळील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्यामुळे संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या या महालक्ष्मी हत्या प्रकरणाचे कारण अद्याप तरी गूढच आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKarnatakकर्नाटक