शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

२५ लाखांची लॉटरी, दुबईच्या आलिशान कारचे आमिष, शिक्षकाला २९ लाखांना लुबाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 09:57 IST

बीड : केबीसी (कौन बनेगा करोडपती) नावाच्या व्हॉटस्एँप ग्रुपमध्ये समाविष्ट करून येथील एका शिक्षकाला सायबर भामट्यांनी तब्बल २९ लाख ...

बीड : केबीसी (कौन बनेगा करोडपती) नावाच्या व्हॉटस्एँप ग्रुपमध्ये समाविष्ट करून येथील एका शिक्षकाला सायबर भामट्यांनी तब्बल २९ लाख २३ हजार रुपयांना गंडविले. २५ लाख रुपयांची लॉटरी, दुबईच्या आलिशान कारचे आमिष दाखवून तब्बल ३० टप्प्यांत ही रक्कम उकळण्यात आली. ३ मार्च रोजी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

मोहम्मद फहीमोद्दीन अब्दुल रहीम (५२, रा. झमझम कॉलनी, बीड) असे फसवणूक झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. त्यांच्या पत्नी गेवराईत जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका असून ते बीडमध्ये इस्लामपुरा येथील नॅशनल उर्दू प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. ११ डिसेंबर २०२१ रोजी ते घरी होते. यावेळी अचानक त्यांना एका व्हॉटस्एँप ग्रुपवर अनोळखी व्यक्तीने समाविष्ट केले. केबीसी नावाच्या या ग्रुपवर एक व्हिडिओ शेअर केला गेला. ज्यात २५ लाखांची लॉटरी व आलिशान कार बक्षीस म्हणून दिल्याचे दाखविले होते. १३ डिसेंबर रोजी शिक्षक मोहम्मद रहीम यांनी संबंधित मोबाइल क्रमांकावर संपर्क केला. त्याने मोहम्मद यांना बोलण्यात गुंतवून ठेवत ३० टप्प्यांत प्रक्रिया शुल्क, टॅक्स, जीएसटी, सेवाशुल्क, वाहतूक खर्च आदींच्या नावाखाली सुमारे २९ लाख २३ हजार रुपये उकळले. शहर पोलीस ठाण्यात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये मनीष कुमार, आकाश वर्मा यांच्यावर गुन्हा नोंद झाला. तपास पोलीस निरीक्षक रवी सानप करत आहेत.

३१ व्या वेळी पैशांची मागणी केली अन्....

सायबर भामट्यांनी शिक्षक मोहम्मद रहीम यांना गोड बोलून स्वप्नांच्या दुनियेत नेले. त्यांच्यावर विश्वास ठेवून वेगवेगळ्या खात्यात ते पैसे भरत राहिले. कोणाला सांगू नका, दुबईहून कार येत आहे, असे सांगून कारचे फोटो पाठविले. त्यामुळे मोहम्मद रहीम यांची खात्री पटली. याचा फायदा घेत भामट्यांनी त्यांना लुबाडले. ३१ व्या वेळी पैशांची मागणी केल्यावर मात्र मोहम्मद रहीम हे भानावर आले व त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

१३ डिसेंबर ते १३ फेब्रुवारी या तीन महिन्यांच्या काळात शिक्षकाकडून केबीसी लॉटरी व कारचे आमिष दाखवून २९ लाख रुपये उकळण्यात आले. केवळ आमिषाला भुलून ही फसवणूक झाली. कुठल्याही स्थितीत अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करून नागरिकांनी स्वत:ची फसगत करून घेऊ नये - रवी सानप, पो.नि. शहर पोलीस ठाणे, बीड

टॅग्स :fraudधोकेबाजी