शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ब्यूटी पार्लर, नोकरी अन् तिहेरी हत्याकांड; अवघ्या ६ तासांत पोलिसांनी लावला छडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 18:57 IST

पती-पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी घरातच होते. तेव्हा त्याठिकाणी मोलकरीण पोहचली तेव्हा आरोपींनी तिचीही हत्या केली

नवी दिल्ली - पश्चिम दिल्लीच्या हरिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या तिहेरी हत्याकांडाने मोठी खळबळ माजली. या प्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. त्याचसोबत २ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मुख्य आरोपी युवक आणि त्याची गर्लफ्रेंडसह अन्य आरोपी फरार आहेत. पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे. अशोक नगर भागात आज सकाळी पती-पत्नी आणि मोलकरणीची हत्या झाल्याचं उघड झाले. 

पोलिसांच्या माहितीनुसार, या तिघांचा चाकू भोसकून हत्या करण्यात आली होती. पती-पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी घरातच होते. तेव्हा त्याठिकाणी मोलकरीण पोहचली तेव्हा आरोपींनी तिचीही हत्या केली. नोकरीवरून काढल्यामुळे बदला घेण्याच्या दृष्टीने हे हत्याकांड घडवण्यात आले. मृत शालू ब्यूटी पार्लर चालवत होती. १० दिवसांपूर्वी तिने हत्येतील मुख्य आरोपी आणि त्याची गर्लफ्रेंडला नोकरीवरून काढलं होते. या दोघांसोबत शालूचा वाद झाला होता. त्यामुळे बदला घेण्यासाठी दोघांनी मित्रांसोबत मिळून तिचा काटा काढण्याचं ठरवलं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सचिन, सुजितला अटक केली आहे. तर मुख्य आरोपीसह अन्य फरार आहेत. त्यांनाही लवकर पकडण्यात येईल असं पोलिसांनी म्हटलं. 

लॅपटॉप, कॅश घेऊन फरार४ मजली इमारतील खालच्या मजल्यावर पार्किंग एरियात शालू आणि मोलकरणीचा मृतदेह सापडला तर पहिल्या मजल्यावर समीर अहूजा यांची बॉडी पोलिसांना आढळली. या ४-५ आरोपींचा समावेश होता. ज्यातील दोघांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींच्या घरातून चोरी केलेले सामान जप्त केले आहे. त्याचसोबत हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्र आणि रक्ताने माखलेला टॉवेलही सापडला आहे. हत्या केल्यानंतर आरोपींनी लॅपटॉप, कॅश आणि अन्य सामानाची चोरी केल्याचं पोलीस तपासात पुढे आले. CCTV चा डीवीआर घेऊन पळालेपोलिसांनी सांगितले की, आरोपींनी घरात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून डीवीआर पळवून घेऊन गेले. एका सीसीटीव्ही आरोपी दिसून येत आहे. आरोपी सकाळी ८ च्या सुमारास २ बाईकवरून आले होते. ९ च्या सुमारास हे हत्याकांड करून आरोपी गडबडीने तिथून निघून जाताना दिसले. 

टॅग्स :delhiदिल्ली