शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रवेशद्वारावरच पोलिसांना मारहाण, दोन आंदोलकांवर गुन्हा

By दत्ता यादव | Updated: September 26, 2023 15:39 IST

याप्रकरणी संबंधित आंदोलकांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणासाठी आलेल्या दोन आंदोलकांनी महिला पोलिस उपनिरीक्षक तसेच एका महिला पोलिसाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित आंदोलकांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शोभा शंकर खोत, ओंकार शंकर खोत (रा. शाहूनगर गोडोली, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शोभा खोत आणि ओंकार खोत हे दोघे सोमवार, दि. २५ रोजी दुपारी दीड वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या भिंतीला ‘आमरण उपोषण’ असे लिहिलेला फलक ते लावत होते. त्यावेळी हा फलक लावण्यास पोलिसांनी विरोध केला. 

सहायक पोलिस निरीक्षक केनेकर यांना त्यांनी अरेरावीची भाषा केली. तर शोभा खोत या शिवीगाळ करून अंगावर धावून गेल्या. महिला पोलिस शहनाज शेख व महिला पोलिस उपनिरीक्षक भोसले यांनी त्यांना विरोध केला असता संबंधितांनी त्यांना हाताने मारहाण केली. तर शोभा खोत यांनी जोरजोरात ओरडून पोलिसांविषयी अपशब्द वापरले. या प्रकारानंतर महिला पोलिस शहनाज शेख यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक पालवे या अधिक तपास करीत आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी