शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीच्या मागावर असलेल्या तेलंगणा पोलीसांना मारहाण;ग्रामस्थांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 17:37 IST

स्थानिक पोलीस प्रशासनाला पूर्वकल्पना न देता ताब्यात घेणे तेलंगणा पोलिसांना पडले महागात

ठळक मुद्देअपहरणकर्ते समजून ग्रामस्थांनी दिला चोप

सेनगाव : तेलंगणा येथून 420 च्या गुह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी आलेल्या पोलिसांना अपहरणकर्ते समजून शेगांव खोडके येथील ग्रामस्थांनी मारहाण करत तब्बल सहा तास डांबून ठेवले. तसेच हिंगोलीपोलिस दलाच्या चारचाकी वाहनांवर दगडफेक करण्यात आल्याने येथील ग्रामस्थांवर 353 सह अन्य कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

दि.3 नोव्हेंबर रविवार रोजी तेलंगणा येथून पोलीस पथक अपराध क्र.235/19 कलम 420,417,34 आयपीसी मधील आरोपीचा मोबाईल लोकेशनद्वारे शोध घेण्यासाठी सेनगाव तालुक्यातील शेगांव खोडके येथे आले होते. रात्री ११ वाजेच्या दरम्यान त्यांनी संशयीत आरोपी म्हणून एका व्यक्तिला ताब्यात घेत गाडीत बसवले. मात्र गांवकऱ्यांना त्यांच्यावर अपहरण करीत असल्याचा संशय आला. यामुळे ग्रामस्थांनी त्यांना अडवले आणि त्यांना मारहाण करत एका खोलीत तब्बल सहा तास डांबुन ठेवले. 

दरम्यान, रिसोड-वाशिम-गोरेगांव-सेनगाव-हिंगोली पोलीस प्रशासनाला याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून गांवकऱ्यांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र विदर्भातील पोलिसांनी अचानक लाठीचार्ज केल्याने ग्रामस्थांनी रागाच्या भरात दगडफेक केली. यानंतर हिंगोलीमधून पोलिसांची कुमक बोलावून तेलंगणा पोलिसांची रात्री उशिरा सुटका करण्यात आली. गोरेगांव पोलिसांनी शेगांव खोडके येथील राजू खोडके, संतोष खोडके, रिसोड येथील आतीक तसेच म्हाळशी येथील गणेश सीताराम गायकवाड, उर्मिला गणेश गायकवाड व इतरांवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी व शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी 208/19 नुसार कलम 353,332,143,147,148,149,152 भादवी सह तीन सार्वजनिक नुकसान प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोलीPoliceपोलिसTelanganaतेलंगणा