शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
4
भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
5
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
6
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
7
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
8
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
9
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
10
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
11
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
12
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
13
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
15
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
16
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
17
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
18
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
19
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
20
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!

'तुम्हाला येथून पळवून लावू' असे म्हणत बहिण-भावाला मारहाण!

By शेखर पानसरे | Updated: September 12, 2023 14:48 IST

या प्रकरणी १८ वर्षीय युवकाने दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

संगमनेर : ‘तुम्ही येथील रहिवासी नाहीत, तुम्हाला येथून पळवून लावू’ असे म्हणत बहिण-भावाला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. मुलीचा विनयभंग केला. हा प्रकार संगमनेर शहरातील जमजम कॉलनी परिसरात रविवारी (दि.१०) रात्री ९ वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणी १८ वर्षीय युवकाने दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.      सलमान युनूस शेख, जुनेद युनूस शेख (दोघेही रा. नॅशनल स्कुलजवळ, कोल्हेवाडी रस्ता, संगमनेर), फरदिन अन्सार शेख (रा. मदिनानगर, संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. १८ वर्षीय युवक आणि त्याची बहीण हे दोघेच घरात असताना सलमान शेख, जुनेद शेख आणि फरदिन शेख हे तिघे त्यांच्या घरी गेले. सलमान आणि जुनेद या दोघांनी मुलीची छेड काढत तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. 

तिचा भाऊ त्यांना समजावून सांगत असताना तिघांनीही बहिण-भावाला शिवीगाळ करत मारहाण केली. ‘तुम्ही येथील रहिवासी नाहीत, तुम्हाला येथून पळवून लावू’ अशी दमबाजी केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनखाली पोलिस नाईक गवळी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी