शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
5
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
6
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
7
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
8
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
9
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
10
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
11
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
12
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
13
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
14
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
15
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
16
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
17
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
18
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
19
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
20
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना

स्वस्त कपड्यांच्या शोधात मारहाण अन् लूट; खार लिंकिंग रोड येथील घटना, एकाला अटक

By मनीषा म्हात्रे | Updated: April 13, 2023 15:00 IST

खार पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.  

मुंबई : स्वस्त कपड्यांच्या शोधात तरुणाला आडोशाला नेत मारहाण करत लुटल्याची धक्कादायक घटना खार लिंकिंग रोड येथे घडली. तरुणाने आरडा ओरडा करताच गस्तीवर असलेल्या पोलिसांनी तेथे धाव घेताच, आरोपींनी पळ काढला. खार पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.  

खार परीसरातील जवाहर नगर येथे सुवो श्यामल हिरा (२२) हा तरुण मंगळवारी रात्री साडे नऊच्या सुमारास खरेदीसाठी तो लिकिंग रोड येथे आला होता. याच, दोघे जण त्याच्याकडे आले. स्वस्तामध्ये कपडे देण्याच्या बहाण्याने तेथील गल्लीमध्ये घेवून गेले. तेथे मारहाण करण्यास सुरुवात करत त्याच्याकडील ४ हजारांची रोकड काढून घेतली. त्याने, आरडा ओरडा करताच,  गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्याच्या दिशेने धाव घेतली. आरोपीने पळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत दोघांना अटक केली आहे.

इम्रान उमर मेनन , मो. शमिन शमशु इस्लाम कुरेशी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कुरेशी हा मुंब्रा येथील रहिवासी असून रिक्षाचालक आहे. रिक्षाच्या व्यवसायाआड अशाप्रकारे लूट करत असल्याचा संशय पोलिसांना आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे. तर, इम्रान हा धारावीचा रहिवासी असून अभियलेखावरील आरोपी आहे. त्याच्या विरुद्ध आंबोली पोलीस ठाण्यातही गुन्हा नोंद आहे.  बुधवारी पहाटेच्या सुमारास दोघानाही अटक करण्यात आली आहे. 

काळजी घ्या...

अशा ठिकाणी खरेदीला जाताना काळजी घेणे गरजेचे आहे. अशाप्रकारे कुणाच्या आमिषाला बळी पडून जावू नये असेही आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. 

टॅग्स :RobberyचोरीPoliceपोलिस