शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मारहाण करून व्यावसायिकाला लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 03:41 IST

नेरुळ रेल्वेस्थानकाबाहेर व्यावसायिकाला मारहाण करून लुटल्याची घटना घडली आहे.

नवी मुंबई : नेरुळ रेल्वेस्थानकाबाहेर व्यावसायिकाला मारहाण करून लुटल्याची घटना घडली आहे. व्यावसायिकाच्या कारमध्ये घुसलेल्या व्यक्तीने स्वत:कडील पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्याकडील पैशाची बॅग पळवण्याचा प्रयत्न केला. या वेळी दोघांच्या झटापटीत ते पिस्तूल बनावट असल्याचे उघड झाले.हेमंत गुप्ता (४८) असे मारहाण झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. ते नेरुळचे राहणारे असून, नेरुळ रेल्वेस्थानकाच्या इमारतीमध्ये त्यांचा कम्प्युटर पार्ट्सच्या विक्रीचा व्यवसाय आहे. या व्यवसायातून दररोज जमा होणारी रक्कम सोबत घेऊन ते घरी जातात. त्यानुसार सोमवारी रात्री ते व्यवसायातून जमा झालेली ८६ हजार रुपयांची रोकड घेऊन घरी चालले होते. या वेळी ते पार्किंगमधील कारमध्ये जाऊन बसले असता, एक अनोळखी व्यक्ती कारमध्ये घुसली. त्याने पोलीस असल्याचे सांगून सोबत पोलीसठाण्यात येण्यास सांगितले. मात्र, गुप्ता यांनी त्यास नकार दिल्यानंतर त्या अज्ञात व्यक्तीने स्वत:कडील पिस्तूल काढून गुप्ता यांना धमकावत पैशाची मागणी केली. या वेळी गुप्ता यांनी पैसे नसल्याचे सांगत त्याला प्रतिकार केला. त्या वेळी अनोळखी व्यक्तीने पिस्तूलच्या दांडक्याने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली असता, ते बनावट असल्याचे गुप्ता यांच्या लक्षात आले. यामुळे त्यांनी सदर व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्याच्याकडील पिस्तूलचे दोन भाग होऊन ते कारमध्येच पडले. त्याच वेळी सदर व्यक्तीने गुप्ता यांच्याकडील रोकड घेऊन अंधारात पळ काढला. या घटनेप्रकरणी त्यांनी नेरुळ पोलिसांकडे तक्रार केली असता, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हेमंत गुप्ता हे दररोज सोबत रोकड बाळगत असल्याची माहिती मिळवून त्यांना लुटण्यात आल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यानुसार नेरुळ पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी