शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत बँक ऑफ बडोदाला २३ कोटींचा गंडा घालणारा अटकेत

By शरद जाधव | Updated: September 20, 2022 21:54 IST

आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई : दोन वर्षांपासून पोलिसांना चकवा

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : बेदाणा, हळदीचा माल तारण ठेवून त्या मोबदल्यात कर्ज घेऊन परस्पर तो शेतीमाल विकून बँक ऑफ बडोदाला २३ कोटी १२ लाख ७४ हजार रुपयांना गंडा घालणाऱ्यास अटक करण्यात आली. अजित नारायण जाधव (वय ४५, रा. विश्रामबाग, सांगली) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुंबई येथील सीएनएक्स कॉर्पोरेशन कंपनीचे मिरज-तासगाव रोडवर कोल्ड स्टोअरेज उभारण्यात आले होते. या कोल्ड स्टोअरेजमध्ये बेदाणा, हळदीचा साठा होता. कंपनीने हा शेतीमाल बडोदा बँकेकडे तारण ठेवून शेतकऱ्यांच्या नावे २३ कोटी १२ लाख ७४ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड केल्याशिवाय शेतीमालाची विक्री न करण्याचा करारही कंपनीने बँकेसोबत केला होता. मात्र, या कराराचा भंग करत मार्च २०१७ ते नोव्हेंबर २०२० या कालावधीत कोल्ड स्टोअरेजमधील शेतीमाल बँकेच्या परवानगीविनाच परस्पर विकण्यात आला होता. कर्जासाठी तारण ठेवलेल्या बेदाण्याची विक्री करण्यात आल्याचे बँकेच्या लक्षात येताच त्यांनी सीएनएक्स कॉर्पोरेशन कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकासह एरिया व्यवस्थापकाविरोधात पोलिसांत फिर्याद दिली होती.

फसवणुकीची रक्कम मोठी असल्याने या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. तेव्हापासून कंपनीचा व्यवस्थापक असलेल्या अजित जाधवचा पोलिसांकडून शोध सुरू होता. अखेर मंगळवारी त्याला अटक करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली.चौकट

जाधवला नऊ दिवसांची कोठडीगेल्या दोन वर्षांपासून पोलीस जाधवच्या शोधात हाेते. आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरूच होता. जाधव याला जेरबंद करण्यात आल्यानंतर त्यास न्यायालयात हजर करण्यात आले यावेळी त्याला नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजी