शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशींना ८ हजारांत मिळते बनावट रेशनकार्ड; तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 10:37 IST

भिवंडीत एटीएसकडून रॅकेट उद्ध्वस्त; तिघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई/भिवंडी : घुसखोर बांगलादेशींना बनावट कागदपत्रांच्या आधारे अवघ्या ८ हजारात रेशनकार्ड बनवून देणाऱ्या टोळीचा महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाच्या (एटीएस) ठाणे युनिटने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी भिवंडीतून इरफान अली अन्सारी, संजय बोध आणि नौशाद राय अहमद शेख या तिघांना अटक करण्यात आली आहे.

भिवंडी परिसरात बनावट रेशनकार्ड बनविणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती एटीएसला मिळाली. त्यानुसार, पथकाने बनाव करत टोळीला आपल्या जाळ्यात ओढले. त्यांच्याकडून बनावट रेशनकार्डची मागणी केली. त्यांनी ८ हजारात रेशनकार्ड देण्याची तयारी दर्शवताच पथकाने सापळा रचून तिघांवर कारवाई केली आहे. बनावट कागदपत्रांचा वापर करून बांगलादेशातील नागरिकांना रेशनकार्ड बनवल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे. नौशाद हा रेशन दुकान चालवतो. अन्य दोघांच्या मदतीने बनावट कागदपत्रे बनवून नागरिकांना बनावट रेशन कार्ड मिळवून देण्यात मदत केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी या प्रकरणात निजामपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुढील तपास व कारवाईसाठी तिन्ही आरोपींना स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांनी आतापर्यंत शेकडो लोकांना अशाप्रकारे रेशनकार्ड बनवून दिल्याचा संशय असून त्यानुसार अधिक तपास सुरू आहे. यामध्ये कुणाचा संबंध आहे का, याबाबत पोलिस त्रिकुटाकडे चौकशी करत आहे.

बाेगस कागदपत्रे जप्त

  बनावट शिधावाटप पत्रिका बनवून अवघ्या आठ हजार रुपयांत विक्री करणारे मोठे रॅकेट भिवंडीत कार्यरत हाेते. यात एका शिधावाटप दुकानदाराचादेखील सहभाग आहे.  भिवंडीत बनावट कागदपत्रांच्या आधारे शिधावाटप पत्रिका बनवून दिली जात असल्याची माहिती ठाणे येथील दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे निजामपूर पोलिस ठाणे हद्दीत लबेला ज्यूस सेंटर हसीन सिनेमा येथे सापळा रचून पथकाने कारवाई केली.   त्याठिकाणाहून अनेक रेशनकार्डसंबंधित बनावट कागदपत्रेही जप्त केली आहेत. 

टॅग्स :Bangladeshबांगलादेशbhiwandiभिवंडीthaneठाणे