शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

बांग्लादेशी महिला प्रकरण:  रेश्मा खानच्या याच जन्मदाखल्यामुळे प्रकरण झाले 'ट्रिगर' !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 10:51 IST

पश्चिम बंगालच्या शासकीय विभागाचे पडताळणीपत्रही 'लोकमत' च्या हाती. आता 'सीआययु' च्या कारवाईकडे पोलीस खात्याचे लक्ष

गौरी टेंबकर - कलगुटकरमुंबई: भारतीय पासपोर्ट बनविण्यासाठी भाजपचे पदाधिकारी शाहीन हैदर आझम यांची बांग्लादेशी असलेली दुसरी पत्नी रेश्मा खान हिने बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा आरोप आय ब्रँचचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक कुरुलकर यांनी केला आहे. तिच्या जन्मदाखल्यामुळे तिच्यावर सर्वात आधी पोलिसांना संशय आला होता आणि हे प्रकरण 'ट्रिगर' झाले. हा दाखला आणि पश्चिम बंगालच्या शासकीय विभागाने दिलेला पडताळणी अहवाल 'लोकमत' च्या हाती लागला आहे, ज्यात त्यांच्याकडे खानच्या जन्मनोंदीचे काही रेकॉर्डच नसल्याचे उघड होत आहे. त्यानुसार गुन्हेगारी गुप्तवार्ता पथक (सीआययु) याप्रकरणी पुढे काय कारवाई करते? याकडे संपूर्ण पोलीस खात्याचे लक्ष लागले आहे.

कुरुलकर यांनी सीआययुला दिलेल्या जबाबानुसार, रेश्माची जन्मतारीख १६ फेब्रुवारी १९८९ असे नमुद केलेला आणि १९ जुलै १९९७ रोजी जारी करण्यात आलेला जन्मदाखला तिने पासपोर्ट मिळण्यासाठी दिला होता, जो पश्चिम बंगाल येथून जारी करण्यात आल्याचे दिसत होते.

हाच तो जन्मदाखला ज्यामुळे पहिल्यांदा आय ब्रँचला रेश्मा खानवर संशय आला आणि त्यांनी तो पडताळणीसाठी वेस्ट बंगालच्या संबंधित विभागाकडे पाठवला.

मात्र त्यातील मजकुराच्या ठळक भागाची पाहणी केली असता वरील भाग स्टॅम्पचा आणि त्याखाली गाळलेल्या जागी हस्ताक्षरे दिसून आल्याने तो बोगस असल्याचा संशय त्यांना आला. या जन्म दाखल्याची पडताळणी पश्चिम बंगालच्या डिस्ट्रिक्ट रेकॉर्ड अँड कोपीइंग सेक्शन ,नॉर्थ २४ पारगनास बारसात येथील शासकीय अधिकाऱ्यांकडे केल्यावर त्यांच्याकडे रेश्मा खानच्या जन्मनोंदीचे रेकॉर्डच नसल्याची माहिती आय ब्रँचच्या पडताळणी पथकाला मिळाली.

पश्चिम बंगालच्या संबंधित विभागाने दाखला बोगस असल्याचे मुंबई पोलिसांना सांगितले. त्याचा हा पुरावा लोकमतकडे आहे.

सदर जन्मदाखला, त्याचे संबंधित विभागाकडून आलेले पडताळणी पत्र 'लोकमत' च्या हाती लागले आहे. तिने पासपोर्ट मिळविण्यासाठी वापरलेल्या कागदपत्रांपैकी हा दाखला असल्याने तो बोगस असल्याचे उघड झाले आहे. याबाबत कुरुलकर यांना मोबाईल आणि मेसेज करत संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी उत्तर दिले नाही. दरम्यान सीआययुचे याप्रकरणी पुढचे पाऊल काय असेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.

टॅग्स :Bangladeshबांगलादेश