शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशी अभिनेत्रीवर बलात्कार, खुनाचा प्रयत्न; व्यावसायिकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 06:05 IST

पोरी मोनी या नावाने परिचित असलेली अभिनेत्री शमसुन्नहर स्मृतीने फेसबुकवरील पोस्टवर याप्रकरणी पंतप्रधान शेख हसीना यांच्याकडे न्यायाची मागणी केली होती.

ढाका :  एका व्यावसायिकाने  बलात्काराचा आणि खून करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप बांगलादेशी अभिनेत्री शमसुन्नहर स्मृतीने  केल्यानंतर  त्या व्यावसायिकाला अटक करण्यात आली आहे.

पोरी मोनी या नावाने परिचित असलेली अभिनेत्री शमसुन्नहर स्मृतीने फेसबुकवरील पोस्टवर याप्रकरणी पंतप्रधान शेख हसीना यांच्याकडे न्यायाची मागणी केली होती.रविवारी रात्री तिने पत्रकार परिषद घेऊन  स्थावर मालमत्ता व्यावसायिक आणि ढाका बोट क्लबचे मनोरंजन आणि सांस्कृतिक व्यवहार सचिव नसीर यू. महमूद यांनी हल्ला केल्याचा आरोप केला होता. सोमवारी अभिनेत्री शमसुन्नहर स्मृतीने व्यावसायिक नसीर यू. महमूद आणि अन्य चौघांविरुद्ध तक्रार दाखल केली. चार दिवसांपूर्वी नसीरने ढाक्यातील क्लबमध्ये माझ्यावर हल्ला केला, असा आरोप तिने तक्रारीत केला आहे.

या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकून व्यावसायिक नसीर आणि अन्य चौघांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या दोघांच्या नावाचा एफआयआरमध्ये समावेश असून अन्य  तिघे त्यांचे साथीदार आहेत, असे डेली स्टारच्या वृत्तात म्हटले आहे. 

पार्ट्या आयोजित करून महिलांचे शोषण...nढाका महानगर पोलिसच्या गुप्तचर शाखेचे सह-आयुक्त हारुण ऊर्फ रशिद यांनी सांगितले की, धाडीदरम्यान दारू आणि अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याने या पाच जणांविरुद्ध अमली पदार्थ नियंत्रण कायद्याखालीही गुन्हा दाखल केला जाईल. आरोपी विविध क्लबमध्ये पार्ट्या आयोजित करायचा. तेथे महिलांचे शोषण केले जायचे. आरोपींविरुद्ध अन्य लोकांनीही तोंडी तक्रारी केल्या आहेत. यापैकी एखाद्याने तक्रार दाखल केल्यास गुप्तचर विभाग कायदेशीर कारवाई करील. 

nतत्पूर्वी, अभिनेत्री शमसुन्नहर स्मृतीने फेसबुकवरील पोस्टवर पंतप्रधान हसीना यांना आई संबोधत दावा केला की, मी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांकडे मदत मागितली; परंतु, न्याय मिळाला नाही. मला न्याय कोठे मिळेल.  चार दिवसांपासून न्यायासाठी भटकत आहे. प्रत्येक जण माझे ऐकून घेतात, परंतु, कारवाई कोणीही करीत नाही. मी एक मुलगी आणि अभिनेत्री आहे; परंतु, त्या आधी मी एक माणूस आहे, मी गप्प राहू शकत नाही, असे तिने बांगला भाषेतील पोस्टमध्ये म्हटले आहे.

टॅग्स :Bangladeshबांगलादेश