शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरात उडणाऱ्या उपकरणांवर बंदी 

By पूनम अपराज | Updated: January 5, 2021 21:15 IST

Mumbai Police : या नियमाचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात भा. दं. वि . कलम १८८ अन्वये कारवाई केली जाईल. 

ठळक मुद्दे २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिन आणि मुंबईला दहशतवादी हल्ल्याच्या मिळणाऱ्या धमक्या लक्षात घेऊन हा आदेश काढण्यात आला आहे. 

मुंबईमुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ३१ डिसेंबर 2020 ते २९ जानेवारी २०२१ या कालावधी ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलवर चालणारे मायक्रो लाईट एअर क्राफ्ट, एरिएल मिसाईल आदी तत्सम उपकरणीय वापरांवर (Flying Activities) बंदी आदेश काढण्यात आले आहेत. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात भा. दं. वि . कलम १८८ अन्वये कारवाई केली जाईल. 

२६ जानेवारी, प्रजासत्ताक दिन आणि मुंबईला दहशतवादी हल्ल्याच्या मिळणाऱ्या धमक्या लक्षात घेऊन हा आदेश काढण्यात आला आहे. शहरातील सुरक्षा व्यवस्था पाहता खबरदारीचा उपाय म्हणून गृह विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. याचाच परिणाम असा आहे की, नवीन वर्षाच्या निमित्ताने वाहतूक पोलिसांचे आधुनिकीकरण करणे, सेगवे अर्थात स्वयंचलित स्कूटर, इलेक्ट्रिक सायकली आणि सीसीटीव्ही कॅमेरे या अतिरिक्त उपयोजनांव्यतिरिक्त, सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रशासनाकडून सामाजिक उपक्रमांवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत ५५ हजाराहून अधिक आरोपींवर गुन्हे दाखल झाले आहेत, तर २५ हजाराहून अधिक आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. २१ हजार आरोपींना नोटीस बजावण्यात आली असली, तरी ८५ हून अधिक आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांचा पोलिस शोध घेत आहेत.शहरातील सुरक्षा यंत्रणेत कोणताही निष्काळजीपणा नाही आणि सुरक्षेच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांविरुद्ध प्रशासन अगदी कठोर उपाययोजना करत असल्याचा मुंबई पोलिसांचा दावा आहे. मुंबई पोलीस प्रवक्ते एस. चैतन्य यांनी जनतेला आवाहन केले आहे की, शहरातील शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांना सहकार्य करा. लॉकडाउनचे कलम १८८ चे पालन करा आणि मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या आजूबाजूला फिरू नका किंवा कोणत्याही प्रकारच्या उडणाऱ्या उपकरणांचा दिलेल्या कालावधीत वापर करू नका.

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबईRepublic Dayप्रजासत्ताक दिन