झारखंडच्या बाबानं गंडवलं; पिझ्झा बर्गरची फ्रेंचायसीसाठी २२ लाखाना फसवले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2022 10:44 PM2022-04-02T22:44:29+5:302022-04-02T22:44:41+5:30

भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक परिसरात तपस गोकुल बाग हे सोनारकामचा व्यवसाय करतात . ७ नोव्हेंबर २०१८ रोजी घरी सत्यनारायणाच्या पूजेसाठी त्यांनी झारखंड वरून दानेश्वर ओजा ह्या बाबास बोलावले होते .

Baba of Jharkhand cheated Rs 22 lakh for Pizza Burger franchise | झारखंडच्या बाबानं गंडवलं; पिझ्झा बर्गरची फ्रेंचायसीसाठी २२ लाखाना फसवले 

झारखंडच्या बाबानं गंडवलं; पिझ्झा बर्गरची फ्रेंचायसीसाठी २२ लाखाना फसवले 

Next

मीरारोड - झारखंड वरून आलेल्या एका बाबाच्या सांगण्या वरून पिझ्झा बर्गर ची फ्रॅन्चायसी साठी दिलेल्या २२ लाखांच्या व्यवहारात फसवणूक झाल्याने भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्यात बाबासह ५ जणां विरदुः गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 

भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक परिसरात तपस गोकुल बाग हे सोनारकामचा व्यवसाय करतात . ७ नोव्हेंबर २०१८ रोजी घरी सत्यनारायणाच्या पूजेसाठी त्यांनी झारखंड वरून दानेश्वर ओजा ह्या बाबास बोलावले होते . पूजा झाल्यानंतर दहा दिवस त्यांच्या घरीच राहायला होता . त्यावेळी बाबा ओझा ह्याने त्याआआआच्या ओळखीचे रितेश पटेल नावाचे व्यावसायिक असून त्यांच्या कंपनीत  पैसे गुंतवले तर २० टक्के कमिशन मिळेल असे तपस यांना सांगितले . बाबाच्या सांगण्या वरून जियाकुल फुडवर्कर प्रा. लि. कंपनीचे मालक रितेश पटेल ह्याची भेट घेतली. 

कंपनी पिझ्झा बर्गर बनविण्याचे काम करते व त्याच्या एक फ्रेंचायसी साठी ११ लाख रुपये द्यावे लागतील असे पटेल ने तपस यांना सांगितले . ओझा बाबा वर विश्वास ठेऊन तपस यांनी पटेल व त्याचे भागीदार सुमितकुमार पांडे , रामपाल कुमार वर्मा, राजेंद्रसिंग गरेवाल यांच्याशी व्यवहार ठरवून भाईंदर व गोरेगाव येथे फ्रॅन्चायसी साठी रोख १० लाख व धनादेश द्वारे  ११ लाख ९० हजार असे मिळून २१ लाख ९० हजार रुपये दिले.  परंतु करारनामा करण्यास वारंवार सांगून देखील पटेल आणि भागीदार टाळाटाळ करू लागले. 

दरम्यान काही दिवसांपूर्वी ठाणे येथे पटेल हा फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक झाल्याची व ओझा बाबा ह्याला ४ लाख रुपये कमिशन दिल्याची माहिती तपस याना मिळाली . झालेली अशी माहिती मिळाली होती. आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्याने भामट्या बाबा सह इतर चार जणांच्या विरोधात नवघर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे .  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास नवघर पोलीस हे करत आहेत.

Web Title: Baba of Jharkhand cheated Rs 22 lakh for Pizza Burger franchise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.