शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत भरदिवसा तीन एटीएम फोडणाऱ्या आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 18:07 IST

भरदिवसा विविध ठिकाणचे तीन एटीएम फोडून त्यातील रोकड लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्देअटकेनंतर आरोपी मनोरुग्ण असल्याचे समोर आले.

औरंगाबाद : भरदिवसा विविध ठिकाणचे तीन एटीएम फोडून त्यातील रोकड लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तो मनोरुग्ण असल्याचे समोर आले. पुढील कारवाईसाठी त्याला पुंडलिकनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

प्रदीप ऊर्फ लखन रणजित वानखेडे (३०, रा. छोटा मुरलीधरनगर), असे आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक रामेश्वर थोरात यांनी सांगितले की, १३ जुलै रोजी सकाळी ७ ते ८.१५ वाजेदरम्यान उस्मानपुरा येथील सेंट्रल बँक आॅफ इंडिया आणि येस बँकेचे, तर गजानन महाराज मंदिर ते गारखेडा रस्त्यावरील भारतीय स्टेट बँकेचे एक, असे तीन एटीएम फोडून त्यातील रोकड लुटण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी उस्मानपुरा आणि पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे.

भरदिवसा एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याने शहरात खळबळ उडाली होती. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अनिल वाघ, कर्मचारी मनोज चव्हाण, भगवान शिलोटे, हकीम पटेल, संतोष सूर्यवंशी, संजय खोसरे, नितीन मोरे आणि सानप हे घटना घडल्यापासून तपास करीत होते. दोन्ही एटीएम सेंटरवरील सीसीटीव्ही फुटेज आणि सेफ सिटी कॅमेऱ्यांच्या फुटेजची तपासणी केली असता एटीएम फोडणारा एकच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. शुक्रवारी सकाळी तो पोलिसांना रेल्वेस्टेशन परिसरात दिसला. मात्र, खात्री करण्यासाठी पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात न घेता त्याच्यावर दुरून नजर ठेवण्याचे ठरविले. 

मध्यवर्ती बसस्थानकापर्यंत केला पाठलागआरोपी मनोरुग्णासारख्या हालचाली करीत असल्याचे दिसले. त्याला दारू, गांजाचे व्यसन आहे. सकाळी तो रेल्वेस्टेशनकडून मध्यवर्ती बसस्थानकाकडे पायी निघाला. पोलीस त्याच्या मागावर होते. बसस्थानक परिसरातील दारू  दुकानात तो गेला आणि दुकानदाराकडे त्याने दारू मागितली. त्याच्याकडे पैसे नसल्याने दुकानदाराने त्याला टोमॅॅटो दिले. तो टोमॅटो खात बाहेर आला. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन गुन्हे शाखेत आणले. त्याने एटीएम फोडल्याची कबुली दिली.

टॅग्स :ArrestअटकatmएटीएमAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीस