शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

सावधान, तुम्हालाही परदेशी नोकरीची ऑफर आली का? आंतरराज्यीय टोळीचा झाला पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 13:13 IST

गुन्हे शाखेकडून कारवाईत पाच जणांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: परदेशी नोकरीच्या बेरोजगार तरुणांना लक्ष्य करत फसवणूक करणाऱ्या आंतराज्यीय टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. यामध्ये ३० ते ४० जणांची फसवणूक करत भामटे कार्यालयाला टाळे ठोकून पसार झाले होते. याप्रकरणी एमआरए मार्ग पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला. गुन्हे शाखेने या कारवाईत पाच जणांना अटक केली आहे.

ट्रॉम्बे येथील रहिवासी असलेले भरत शांताराम कोळी (४७) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अमितोश श्रवणकुमार गुप्ता(लखनौ) भिवंडीतील फैजान अहमद फारुख अहमद शेख, शेख मन्सुरी मोहम्मद, रामकृपाल रामसेवक कुशवाह यांच्यासह दलाल  प्रमोद कुमार, शुभम सिंह, अरुण सिंह, अजय चौहाणसह त्यांचा बॉस आणि अन्य कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी एमआरए मार्ग पोलिसांच्या हद्दीतील शहीद भगत सिंग रोड परिसरात कार्यालयात थाटले होते. आरोपींनी १९ जून २०२३ ते २९ ऑक्टोबर दरम्यान ही फसवणूक केली आहे.

तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने आंतरराज्यीय टोळी दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश, भिवंडी व मुंबई येथून आपसात संगनमत साधून सक्रिय असल्याचे आढळून आले. त्यानुसार, पोलिस सहआयुक्त लखमी गौतम यांचे मार्गदर्शनाखाली एकूण ५ पोलिस पथके स्थापन करण्यात आली. त्यांना दिल्ली, जिल्हा लखनौ, राज्य उत्तर प्रदेश, जिल्हा गया, राज्य बिहार, भिवंडी महाराष्ट्र येथे पाठविण्यात आले. या पथकांनी आरोपींचा शोध घेऊन नमूद ठिकाणांहून  ५ आरोपींना अटक केली आहे. रामकृपाल रामसेवक कुशवाह (४५, भिवंडी), रोहित महेश्वर सिन्हा (३३, मुंबई), आशिषकुमार माहतो (३०, दिल्ली), अमितेश गुप्ता (४०, लखनौ) आणि राहुलकुमार चौधरी (२२, बिहार) अशी अटक आरोपींची नावे आहे. पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

असे पसरवतात जाळे

बॉम्बे इंटरनॅशनल कन्सल्टन्सी या नावाने बनावट रजिस्टर क्रमांकाने कार्यालय उघडले. कोळी यांच्यासह ३० ते ४० जणांना अझरबैजान येथील पाशा कन्स्ट्रक्शन या कंपनीत नोकरी लावून देतो, असे सांगून जाळ्यात ओढवले. त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी बनावट ऑफर लेटर तसेच अझरबैजान या देशाचा बनावट वर्क व्हिझा तयार केला. त्यांना नोकरीचे आमिष दाखवून कोळी यांच्याकडून ४० हजार तर, अन्य सभासदांकडून प्रत्येकी ३५ ते ६० हजार रुपये उकळले. तरुणांचे पासपोर्ट ताब्यात घेतले होते. ते परत करण्यासाठीही ५ ते १० हजारांची मागणी करण्यास सुरुवात केली. 

अंधेरीत नवीन कार्यालय...

या टोळीने बेरोजगार तरुणांना लक्ष्य केले होते. आरोपींच्या चौकशीत मुंबईत अंधेरी सहार परिसरात अशाच प्रकारे खोटे नवीन नावाने विनापरवाना एजन्सी चालवून, अशाच प्रकारचा गुन्हा करत असल्याचे तपासात निष्पन्न होताच तेथेही छापा टाकून पुढील फसवणूक टाळण्यास पोलिसांना यश आले. 

६३ पासपोर्ट अन्...

पोलिसांनी कारवाई करत ६३ पासपोर्टसह अझरबैजान देशाचे एकूण  ७ बनावट व्हिजा, स्टिकर्स व कागदपत्रे,  ५ संगणक व संगणकीय साहित्य कलर प्रिंटर, ५ लॅन्डलाईन फोन व  ७ मोबाइल फोन इंटरनेट कनेक्शन राउटर, विविध कंपन्यांचे १४ मोबाइल सिम कार्ड, विविध रबरी शिक्के, विविध बँकांचे १० डेबिट कार्ड, ६ चेकबुक व पासबुक, ऑफर लेटर असे गुन्ह्यात वापरण्यात आलेले साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.

टॅग्स :jobनोकरी