शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जळती चिता विझवून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला; सत्य समोर येताच सगळेच हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 20:46 IST

पोलीस जेव्हा स्मशानभूमीत पोहचले तेव्हा जळती चिता विझवून महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेतला.

बल्लमगड - फरिदाबादच्या जवळील बल्लमगड येथील आदर्श कॉलनी हृदयद्रावक घटना घडली आहे. याठिकाणी एका विवाहित महिलेची हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर पती मृत पत्नीचा मृतदेह घेऊन स्मशानभूमीत गेला. तिथे पत्नीवर अंत्यसंस्कार करू लागला परंतु या घटनेची माहिती पत्नीच्या कुटुंबालाही दिली नाही. शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती देताच तात्काळ पोलिसांनी स्मशानभूमीत धाव घेतली. 

पोलीस जेव्हा स्मशानभूमीत पोहचले तेव्हा जळती चिता विझवून महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी या घटनेचा तपास केला तेव्हा मृत महिलेने २ लग्न केल्याचे समोर आले. पहिल्या पतीचे नाव रवी होते ज्याला तिने तलाक दिला होता. त्यानंतर कृष्णा नावाच्या युवकासोबत महिलेने दुसरे लग्न केले. मृत महिलेच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी पती कृष्णाला अटक केली. 

मृत महिलेचे वडील विजेंदर यांनी सांगितले की, माझी मुलगी सविता हिचे २०१५ मध्ये रवीसोबत लग्न झाले होते. आदर्श नगरमध्येच राहणारा कृष्णा हा सविताच्या घरी येऊन जात असे. त्यावेळी कृष्णाने सविताला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. २०१८ मध्ये पहिला पती रवीला घटस्फोट देऊन सविताने कृष्णाशी लग्न केले. परंतु दोघांमध्ये वारंवार वाद होत असे. कृष्णा हा सविताला मारहाण करायचा असा आरोप वडिलांनी केला. 

सवितानं केले होते दुसरं लग्नकृष्णानेच माझी मुलगी सविता हिचा खून केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी लावला. महिलेची हत्या करून पतीने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. संबंधित घटनेबाबत पोलिसांनी मृत सविताच्या कुटुंबियांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांसह ते स्मशानभूमीला पोहचले त्याठिकाणी कृष्णा सविताच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करत होता. पोलिसांनी चितेची आग विझवून मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमसाठी पाठवला. आरोपी कृष्णाला फाशी द्या अशी मागणी मृत महिलेच्या वडिलांनी केली. 

या प्रकरणी पोलीस अधिकारी कुलदीप सिंह म्हणाले की, एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला असून तिचा पती कुटुंबाला न कळवता मृतदेह अंत्यसंस्कार करण्यासाठी घेऊन गेलाय अशी सूचना मिळाली. त्यानंतर तात्काळ पोलीस पथक घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी जळती चिता विझवून मृतदेह ताब्यात घेतला. सध्या या प्रकरणात आरोपी पती कृष्णाला ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली.