शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

मित्राच्या आईवर बलात्काराचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 23:43 IST

बदलापूरमधील घटना; चाकूने केले वार

बदलापूर : आपली मुले चांगल्या संगतीत राहावी, याकडे प्रत्येक पालकाचे लक्ष असते. मात्र, हीच गोष्ट बदलापुरात एका महिलेच्या जीवावर बेतली आहे. मुलाच्या दारूड्या मित्राला आपल्या मुलासोबत न राहण्याची समज दिल्यानंतर त्याने मित्राच्या आईवर बलात्कार करण्याचा आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.

पश्चिमेतील बॅरेज रोडवरील रमेशवाडी भागात हा प्रकार घडला. या भागातील एका गृहसंकुलात पीडित महिला कुटुंबीयांसोबत राहते. त्यांचे पती आणि मुलगा असे दोघेही सरकारी नोकरी करतात; मात्र त्यांच्याच संकुलात राहणाऱ्या दिनेश गोल्हे नामक मुलाशी पीडित महिलेच्या मुलाची मैत्री होती; मात्र दिनेशला दारूचे व्यसन असल्याने या मैत्रीमुळे आपल्याही मुलाला नको त्या सवयी लागतील आणि तो वाया जाईल, अशी भीती या महिलेला होती. त्यामुळे त्यांनी दिनेशला आपल्या मुलासोबत राहू नको, अशी ताकीद दिली होती. त्याचा राग मनात ठेवून दिनेश १२ डिसेंबरला त्या घरी एकट्याच असताना त्यांच्या घरात घुसला. त्यानंतर, त्याने त्या महिलेला जाब विचारत त्यांच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.

महिलेने त्याला जोरदार प्रतिकार केल्यामुळे त्याने थेट चाकूने त्यांच्या गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा वार चुकवण्यासाठी महिलेने हात मध्ये टाकला असता दिनेश याने त्यांच्या हातावर वार केले.यावेळी या महिलेने आरडाओरडा केल्याने जिन्यात कचरा गोळा करत असलेल्या सफाई कामगार महिलेने सोसायटीच्या लोकांना गोळा केले; मात्र दिनेश तिथून पळून गेला. पोलिसांनी त्याला काही तासांमध्येच अटक केली.

बदलापूर पोलिसांनी काही तासांतच दिनेशला अटक केली असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, पीडित महिलेवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. या प्रकारामुळे त्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.