शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वरळीत खंडणीसाठी हत्येचा प्रयत्न; पेटवली कार, आरोपीला बेड्या

By मनीषा म्हात्रे | Updated: November 8, 2023 14:34 IST

आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात १३ गुन्ह्यांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: वरळीत गाडी पार्क करत असताना धक्का लागल्याचा बहाणा करत सराईत गुन्हेगाराने एका व्यावसायिकावर हल्ला चढवत हफ्त्याची मागणी केली. १० हजारांचा हफ्ता न दिल्याच्या रागात त्यांची कार पेटवली. या प्रकरणी वरळी पोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली आहे. वरळी परिसरात राहणारे नुरुद्दीन सलाउद्दीन शेख (३४) हे मेकॅनिक आहे. या प्रकरणी वरळी पोलिसांनी नितीन ताटल्या रमाकांत भोसले (४२) याला अटक करण्यात आली आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध १३ गुन्हे नोंद आहेत.

शेख यांच्या तक्रारीनुसार, ६ तारखेला सायंकाळी साडे चारच्या सुमारास वरळी बिडीडी चाळ परिसरात शेख हे कार पार्क करत असताना, ताटल्या तेथे आला. धक्का लागल्याचा बहाणा करत, तो वरळी पोलीस ठाणेच्या हदीतील मोठा भाई असून परीसरातील लोकांकडून हप्ता वसूल करत असल्याचे सांगितले. शेख यांना धमकावून १० हजार रुपयांचा हप्ता मागीतला. त्यांनी नकार देताच, हातातील कोयत्याने डोक्यात जीवे ठार मारण्याच्या उददेशाने हल्ला चढवला. शेख यांनी गाडीच्या दुसऱ्या दरवाजातून बाहेर पडून नागरिकांना मदतीसाठी आवाज देण्यास सुरुवात केली.

तोपर्यंत शेखने वाहनाची तोडफोड केली. तसेच, गाडीवर बाटलीतून काहीतरी शिपडून गाडी लायटरच्या सहाय्याने पेटवली. घटनेची वर्दी लागताच वरळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शेख यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मंगळवारी हत्येचा प्रयत्नासह खंडणीचा गुन्हा नोंदवला आहे. या गुन्ह्यात आरोपीला अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक