शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

गुन्हे करुन ओळख लपवून बसलेला अट्टल चोरटा एलसीबीच्या गळाला

By निलेश जोशी | Updated: March 24, 2023 15:55 IST

घरफोडी करण्यात होता पटाईत : आरोपीच्या इतर साथीदारांचा शोध सुरु

बुलढाणा : घरफोडी करुन लाखोचा मुद्देमाल लंपास करुन राज्यासह इतर राज्यात स्वत:ची ओळख लपवून बसणाऱ्या अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ही कारवाई २४ मार्च रोजी करण्यात आली असून, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तर त्याच्या इतर साथीदारांचा आता शोध सुरु आहे.

   जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांच्या आदेशान्वये जिल्ह्यात पाहीजेत, फरारी असलेल्या गुंडाचा शोध सुरु आहे. अशातच बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये रात्रीदरम्यान घरफोडीच्या पाच गुन्ह्यातील फरार असलेला सै.शकील सै.युसूफ (जवाहर नगर बुलढाणा) यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ मार्च रोजी अटक केली. त्याची चौकशी केली असता त्याने बुलढाणा शहरासह जिल्ह्यातील चिखली पोलीस स्टेशन अंतर्गंत तीन घरफोड्या, मेहकर पोलीस स्टेशन अंतर्गंत एक घरफोडी, शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत एक घरफोडी सोबतच बोराखेडी आणि बुलढाणा शहर पोलीस स्टेशन अंतर्गंत प्रत्येक एका घरफोडीची कबुली दिली. पथकाने सै.शकील सै.युसूफ यास शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत केलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केली असून, त्याचाकडील गुन्ह्यात वापरलेली स्कुटी,घरफोडीचे साहित्य जप्त केले आहे. तर त्याच्या इतर साथीदारांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथके रवाना झाली आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल जंजाळ, पोलीस उपनिरीक्षक सचिन कानडे, रामविजय राजपूत, पोलीस हेड कॉन्स्टेबल शदर गिरी,राजकुमारसिंग राजपूत, दिपक लेकुरवाळे यांनी केली.

आंध्र प्रदेशापासून दिल्लीपर्यंत तो फिरत असे सहजअटक करण्यात आलेला सै.शकील सै.युसूफ हा बुलढाणा शहरातील रहिवासी असून, तो आंध्र प्रदेश, दिल्ली, गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील इतर शहरात चोरीच्या उद्देशाने सतत फिरत असे. तो अट्टल चोरीच्या सवईचा असल्याने याआधीही त्यांने कारागृहात अनेक वर्ष मुक्काम ठोकलेला आहे. तर पोलिसांना गुंगारा देण्यासाठी तो स्वत:ची ओळख लपविण्यात पटाईत होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी