शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत महिलेवर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 00:10 IST

रत्नागिरी - शहराजवळ टीआरपी येथे एका विवाहितेवर कोयत्याने प्राणघातक वार झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. वार झालेली विवाहिता ३० ...

रत्नागिरी - शहराजवळ टीआरपी येथे एका विवाहितेवर कोयत्याने प्राणघातक वार झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.वार झालेली विवाहिता ३० वर्षीय असून तिची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना गुरुवारी रात्री साडेदहा वाजता घडली. गंभीर जखमी झालेल्या महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिने हल्ला करणाऱ्याचे नाव पोलिसांना सांगितले असून पोलिसांचा तपास सुरू झाला आहे.

या हल्ल्यामध्ये डोके, हात,  मान, पोटावर वार झाल्याने महिलेची प्रकृती चिंताजनक झाली आहे. त्याच परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने विवाहितेवर हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. परंतु हल्ला करण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.ही माहिती मिळताच शहर पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली आहे.

गुरुवारी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास टीआरपी येथील अविष्कार शाळेजवळून ही महिला पावसकर कॉलनी  येथे जात असताना मागून आलेल्या तरुणाने कोयत्याने विवाहितेवर सपासप वार केले. ती रक्ताच्या थारोळ्यात तेथेच खाली पडली. त्यानंतर स्थानिकांनी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. जास्त रक्तस्त्राव झाल्याने तिची प्रकृती चिंताजनक आहे. विवाहितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार नाचणकर चाळ येथील पप्पू शंकर कट्टेमणी या तरुणाने हल्ला केल्याचे पोलिसांना सांगितले आहे. मात्र महिलेकडून पोलिसांना सध्या हीच माहिती उपलब्ध झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत पोलीस आरोपीचा शोध घेत होते. गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.