शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

मालवणीत दोन पोलिसांवर हल्ला; गणवेश फाडला, मिरचीपूड फेकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 06:16 IST

Attack on two policemen in Malvani : दीपक चौहान असे या हल्लेखोराचे नाव असून त्याची महिला साथीदार मीरा देवी हिलादेखील ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस नियंत्रण कक्षावर चित्रकला चौरसिया नामक महिलेने तक्रार केली होती.

मुंबई : महिलेला अश्लील शिवीगाळ करणाऱ्या सराईत आरोपीला अडवणाऱ्या दोन पोलिसांवर  त्याने आणि त्याच्या महिला साथीदाराने हल्ला चढवला. यात एकाचा गणवेश फाडण्यात आला असून त्यांच्या डोळ्यात मिरची पावडरही फेकण्यात आली. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दीपक चौहान असे या हल्लेखोराचे नाव असून त्याची महिला साथीदार मीरा देवी हिलादेखील ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस नियंत्रण कक्षावर चित्रकला चौरसिया नामक महिलेने तक्रार केली होती. त्यानुसार पोलीस हवालदार अशोक चव्हाण आणि पोलीस नाईक देवकर हे बीट मार्शल घटनास्थळी दाखल झाले. त्या वेळी चौरसियाला चौहान अश्लील भाषेत शिवीगाळ करीत होता.  पोलिसांनी त्याला जाब विचारला तेव्हा त्यांच्याशी हुज्जत घालत त्याने झटापट करण्यास सुरुवात केली. देवकर यांच्या  गणवेशाच्या शर्टाचा खिसा फाडला. तसेच मीरा देवीने चव्हाण व देवकर यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. त्यात त्यांना दुखापत झाली आहे. जमा झालेल्यांच्या दिशेनेही दीपकने चाकू उगारून त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. “आम्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल,” असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीस