शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

आरटीओ अधिकारी रविंद्र भुयारविरोधात ॲट्रोसिटी-विनयभंगाचा गुन्हा! 

By योगेश पांडे | Updated: July 25, 2023 20:18 IST

 सिताबर्डी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागपूर : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार यांच्याविरोधात विनयभंग व ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे आरटीओ वर्तुळात खळबळ उडाली आहे. शासकीय सेवेत असलेल्या एका महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिताबर्डी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुयार व संबंधित महिला अधिकाऱ्यामध्ये बऱ्याच काळापासून वाद सुरू आहे. भुयार यांच्याविरोधात महिलेने परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अगोदरच तक्रार केली होती. त्यासंदर्भात बरेच आरोप प्रत्यारोपदेखील झाले. त्याचप्रमाणे या मुद्द्यावरून विधानपरिषद सदस्य आ.वजाहत मिर्झा यांचे नाव समोर करून भुयार यांना २५ लाखांची लाच मागण्यात आली होती व दोघांना अटकदेखील करण्यात आली होती. या प्रकरणात महिलेने अखेर पोलिसांमध्ये तक्रार केली व पोलिसांनी भुयार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

भुयार तिला विनाकारण आपल्या केबिनमध्ये बोलावून बराच वेळ बसवत असे. तसेच मोबाईलमध्ये रस्ता सुरक्षेच्या क्लिपिंग्ज दाखवण्याच्या बहाण्याने अश्लील व्हिडिओ दाखवण्यात आले. भुयार यांनी जवळ जाण्याचा प्रयत्न केल्यावर फटकारल्यावर जातीवाचक शिवीगाळही केली. विभागातील सहयोगी अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये त्याच्याबद्दल नको त्या चर्चा पसरल्या होती. त्याचे म्हणणे ऐकून न घेतल्याने एसीबीच्या प्रकरणात गोवण्याची धमकी दिली, अशी तक्रार महिला अधिकाऱ्याने केली. तिच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भुयारविरुद्ध विनयभंग, शिवीगाळ, धमकी देणे आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

महिलेने उच्च न्यायालयात घेतली होती धावमहिला अधिकाऱ्याने भुयार यांनी सतत लैंगिक छळ केल्याची तक्रार १६ जानेवारी २०२३ रोजी परिवहन आयुक्तांना केली होती. त्यानंतर परिवहन आयुक्तांनी तक्रार निवारण समितीला या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश दिला होता. महिला तक्रार निवारण समितीने १ मार्च २०२३ रोजी परिवहन आयुक्तांना चौकशी अहवाल सादर केला होता. परंतु, दिवाणी न्यायालयाच्या मनाईहुकुमामुळे त्यावर पुढील कारवाई करण्यात आली नाही. परिणामी, तक्रारकर्त्या महिला अधिकाऱ्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी