शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम गॅस कटरने कापून १० लाख ५८ हजार लंपास, सहकारनगरमधील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 23:19 IST

सहकारनगर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएमचे स्वीच बंद करुन  चोरट्यानी एटीएम मशीन गॅस कटरच्या सहाय्याने कापून त्यातील १० लाख ५८ हजार २०० रुपयांची रोकड चोरुन नेली.

पुणे : सहकारनगर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएमचे स्वीच बंद करुन  चोरट्यानी एटीएम मशीन गॅस कटरच्या सहाय्याने कापून त्यातील १० लाख ५८ हजार २०० रुपयांची रोकड चोरुन नेली. चोरट्यांनी जाताना एटीएमचे शटर खाली करुन गेल्याने दोन दिवसानंतर सोमवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला. सीसीटीव्ही बंद झाल्याने कोणतीही हालचाल एटीएममध्ये दिसत नसल्याने बँकेला हा प्रकार लक्षात आला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर सहकार नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

ही घटना २८ एप्रिलला दुपारी १२ ते २९ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान सहकारनगरमधील निर्मल पार्क येथील एटीएममध्ये घडली. याप्रकरणी बँकेचे अधिकारी चेतन दाभोलकर यांनी सहकारनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. या एटीएममध्ये मागील दोन दिवसांपासून सीसीटीव्हीत काही हालचाल दिसत नव्हती़ त्यामुळे बँकेचे अधिकारी सोमवारी दुपारी तेथे दाखल झाले. त्यांनी पाहिले तेव्हा एटीएमचे शटर बंद होते. शटरवर करून त्यांनी आत प्रवेश केला आणि पाहिले तर समोर एटीएम मशीन चक्क गॅस कटरने कापलेली त्यांना दिसली. त्यांनी पाहणी केली तेव्हा त्यातील रोकडही गायब होती. त्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही तपासले तेव्हा त्याचे मेन स्विचही बंद होते. याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दरम्यान सीसीटिव्ही बंद असल्याने लुटतानाचे चित्रिकरण दिसले नाही. तर चोरट्यांनी रोकड लंपास केल्यानंतर शटर बंद करून ठेवले होते. त्यामुळे लोकांनाही ते तांत्रिक बिघाडामुळे बंद असेल असे वाटले होते. त्यामुळे कोणालाही ते समजले नाही. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, सहकारनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

गॅस कटरने एटीएम फोडण्याचे तीन गुन्हे

यापूर्वी चाकण जवळील खालुंब्रे गावातील बँकेचे एटीएम गॅस कटरने फोडून त्यातील १५ लाख रुपये लुटण्याची घटना ३१ मार्च २०१९ रोजी घडली होती. त्याच्याअगोदर भोसरी येथील स्टेट बँकेचे एटीएम गॅस कटरने कापून त्यातील ३५ लाख रुपये चोरट्यांनी लांबविले होते़ ही घटना १६ मार्च २०१९ रोजी घडली होती. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी