शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम बदलून ९० हजार उडविले :  निवृत्त अधिकाऱ्याला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 00:24 IST

एटीएममधून रक्कम काढण्यासाठी मदत करताना सेवानिवृत्त डब्ल्यूसीएल अधिकाऱ्याच्या खात्यातून ९० हजार रुपये उडविल्याची घटना कामठी ठाण्यांतर्गत घडली आहे.

ठळक मुद्देकामठीत घडली घटना

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : एटीएममधून रक्कम काढण्यासाठी मदत करताना सेवानिवृत्त डब्ल्यूसीएल अधिकाऱ्याच्या खात्यातून ९० हजार रुपये उडविल्याची घटना कामठी ठाण्यांतर्गत घडली आहे.मोहनलाल पाल (७०) रा. न्यू तुकाराम ले-आऊट, कळमना हे डब्ल्यूसीएलमधून कार्यालय अधीक्षक पदावरून निवृत्त झाले आहेत. ते कन्हान गोंडेगावचे रहिवासी आहेत. मंगळवारी मतदान करण्यासाठी ते आपला मित्र रमेश यादव सोबत कन्हानला गेले होते. यादवही डब्ल्यूसीएलचे सेवानिवृत्त अधिकारी आहेत. कामठीच्या गरुड चौकाजवळ स्टेट बँक आॅफ इंडियाच्या एटीएमजवळ पाल यांनी यादवला आपले एटीएम देऊन पैसे काढण्यास सांगितले. त्यांनी यादवला एटीएमचा पासवर्ड सांगितला. त्यावेळी एक युवक एटीएमजवळ उभा होता. त्याने पाल आणि यादव यांची चर्चा ऐकली. यादव एटीएममधून पैसे काढत असताना एटीएम मंदगतीने काम करीत होते. दरम्यान आरोपी यादवच्या मागे येऊन उभा झाला. त्याने यादवला मदत करण्याची बतावणी करून एटीएम कार्ड घेतले. त्याने यादव यांची नजर चुकवून त्यांना दुसरे एटीएम देऊन फरार झाला. यादवला फसवणूक झाल्याचे लक्षात आले नाही. एटीएम हाती लागताच आरोपीने पाल यांच्या खात्यातून ८९ हजार ९८८ रुपये आॅनलाईन ट्रान्सफर केले. मोबाईलवर मॅसेज येताच पाल यांना धक्का बसला. त्यानंतर त्यांना एटीएम बदलल्याचे समजले. त्यांनी आपल्या मुलाला सूचना दिली. त्यांच्या मुलाने त्वरित बँकेला सूचना देऊन एटीएम बंद केले. आरोपीने यादव यांना एका महिलेच्या नावाचे एटीएम दिले. ही महिलाही आरोपीची शिकार झाली असावी, असा अंदाज आहे. पाल यांनी कामठी ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी एटीएमच्या सीसीटीव्ही फुटेज आणि ट्रान्सफर केलेल्या रक्कमेचा शोध घेतल्यास आरोपीची माहिती मिळु शकते. घटनेतील आरोपी कुख्यात गुन्हेगार असल्याची शंका आहे. गरुड चौकाच्या एसबीआय एटीएमवर यापुर्वीही बँकेच्या ग्राहकांची फसवणूक झाली आहे. तेथे सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने पैसे काढण्यासाठी येतात. गुन्हेगार मदत करण्याच्या बहाण्याने त्यांची फसवणूक करतात.

टॅग्स :atmएटीएमfraudधोकेबाजी