शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम फोडणाऱ्यांना रायगड पोलिसांनी केले जेरबंद, एसीबी पोहोचली हरीयाणात 

By निखिल म्हात्रे | Updated: December 16, 2022 17:57 IST

मुंबई- नवी मुंबईला जवळ असलेला पेण परीसर गुन्हेगारीच्या नकाशावर येत असून येथील स्टेट बॅंकेचे एटीएम फोडून  ५६ लाख ३४ हजार ८०० रुपये चोरणारे आरोपी पोलिसांनी जेरबंद केले आहेत.

अलिबाग -

मुंबई- नवी मुंबईला जवळ असलेला पेण परीसर गुन्हेगारीच्या नकाशावर येत असून येथील स्टेट बॅंकेचे एटीएम फोडून  ५६ लाख ३४ हजार ८०० रुपये चोरणारे आरोपी पोलिसांनी जेरबंद केले आहेत. जानेवारीला घडलेल्या या गुन्ह्याने रायगड पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले होते. परंतु स्थानिक गुन्हे

अन्वेषन विभागाने अथक प्रयत्न करून परराज्यातील चोरट्यांना अटक केले.

१७ जानेवारी २०२२ रोजी मध्यरात्रीच्या ही घटना घडली होती. चोरट्यांनी शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या एटीएम गॅस कटरच्या साह्याने फोडून ५६ लाख ३४ हजार ८०० रुपयांची रुपयांची रोकड लंपास केली होती. तेव्हापासून या आरोपींचा शोध सुरु होता. अनेक प्रयत्न करूनही गुन्ह्यातील सापडत नव्हते. ही बाब लक्षात घेऊन पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे आणि अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेशण विभागाला या प्रकरणाचा समांतर तपास करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर पोलीस निरिक्षक दयानंद गावडे यांच्या पथकांनी खबऱ्यांमार्फत माहिती संकलित करण्याचे काम सुरु केले होते.

याच तपासा दरम्यान हरीयाणातील तावडू पोलीस ठाण्यात एका दरोड्याच्या गुन्ह्यात दोन आरोपींना अटक माहिती मिळाली. या दोघांचा पेण येथील एटीएम चोरी प्रकरणात सहभाग असल्याची खबर स्थानिक गुन्हे अन्वेशण विभागाला मिळाली, त्यांनी तात्काळ एक पथक हरियाणा येथे रवाना केले. दोन्ही आरोपींची चौकशी केली असता. त्यांनी एटीएम चोरी प्रकरणात सहभाग असल्याचे कबुल केले. यानंतर वसिम अकरम अख्तर हुसेन, माजीद जुम्मा खान या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून केलेल्या चौकशीत या प्रकरणातील आणखिन दोन आरोपी निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी हसन खान, साकीर अब्दुल रहीम खान या दोघांना अटक केली. हे सर्वजण हरियाणामधील पुन्हाना तालुक्यातील रहिवाशी आहेत.