शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

बिर्याणी खाल्ली अन् गळ्याला लावला दोर; प्रियकराचा मृत्यू, प्रेयसी बचावली! कारण अस्पष्ट

By संजय तिपाले | Updated: May 16, 2024 22:36 IST

आरमोरी शहर हादरले, मुलीवर ब्रम्हपुरीत उपचार सुरु

संजय तिपाले, आरमोरी: भेटण्यासाठी ओळखीच्या महिलेच्या घरी अल्पवयीन मुलगी व तिचा प्रियकर एकत्रित आले.दोघांनी गप्पा मारल्या. मित्रांकिरवी हॉटेलातून मागवलेली बिर्याणी खाल्ली अन् त्यानंतर दोघांनीही एकाच दोरीने गळ्याला फास लावला. यात प्रियकराचा जागीच मृत्यू झाला तर प्रेयसी थोडक्यात बचावली. ही खळबळजनक घटना शहरातील बर्डी परिसरात १६ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडली. या घटनेमागील कारण अस्पष्ट आहे.

राहुल गजानन सावसागडे ( वय २०,रा. शिवाजी चौकाजवळ, आरमोरी) असे मयताचे नाव आहे. तो ट्रॅक्टवर मजुरी काम करायचा. त्याचे शहरातीलच एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते. बर्डी परिसरातील एका महिलेच्या घरी दुपारी तीन वाजता ते भेटण्यासाठी एकत्रित आले. गप्पा मारल्यानंतर साडेचार वाजता राहुलने मित्राकरवी हॉटेलमधून बिर्याणी मागवली. दोघांनी बिर्याणी खाल्ल्यानंतर दोघांनीहीत्याच खोलीत स्लॅबच्या लोखंडी हुकला नायलॉन दोरी बांधून गळफास घेतला. यात राहुल सावसागडे याचा मृत्यू झाला तर प्रेयसी बचावली. दरम्यान, तिला तातडीने ब्रम्हपुरी येथे हलविण्यात आले असून सध्या उपचार सुरु आहेत. राहुलचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. आकस्मिक मृत्यूची नोंद असून या घटनेमागील कारण शोधण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही......फोन न घेतल्याने मित्रांना संशयदरम्यान, राहुल सावसागडे हा प्रेयसीसोबत असल्याची माहिती मित्रांना होती. साडेपाच वाजता मित्रांनी त्यास फोन केला असता त्याने कॉल घेतले नाहीत. त्यामुळे त्यांना संशय आला व त्यांनी बर्डी येथील महिलेच्या घरी जाऊन पाहिले असता हा प्रकार समोर आला......खोली कशी काय दिली?दरम्यान, आरमोरीत अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची प्रकरणे वाढल्याचे चित्र आहे. एका अल्पवयीन मुलीला तर वेश्याव्यवसायाच्या दलदलीत लोटण्याचा प्रयत्न एका महिलेनेच केल्याचा धक्कादायक प्रकार येथे उघडकीस आलेला आहे. या घटनेत अल्पवयीन मुलीसह तरुण प्रियकराला ओळखीतील महिलेने खोली उपलब्ध करुन दिल्याचे समोर येत आहे. खोली उपलब्ध करुन कशी दिली, या दृष्टीने आता पोलिसांनी तपास सुरु केल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली