शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाय दाबून देण्याचा बहाणा करत सावत्र मुलीवर अत्याचार; बापाला १० वर्षांची सक्त मजुरी, २५ हजारांचा दंड

By नितिन गव्हाळे | Updated: June 16, 2023 17:54 IST

या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक २ शयना पाटील यांनी १६ जून रोजी आरोपी वडिलांना १० वर्षे सक्तमजुरीचा कारावास यासह २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.

अकोला : मावशीची प्रकृती बरी नसल्याने, तिच्या देखभालीसाठी पत्नीला भुसावळला पाठवून दिले. त्याच रात्री मद्य प्राशन करून आलेल्या वडिलांनी सावत्र मुलीला पाय दाबून देण्याचा बहाणा केला. मुलगी पाय दाबत असतानाच, वडिलांनी नात्याचा कोणताही विचार न करता, तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक २ शयना पाटील यांनी १६ जून रोजी आरोपी वडिलांना १० वर्षे सक्तमजुरीचा कारावास यासह २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.पीडित मुलीच्या आईने २१ सप्टेंबर २०१४ रोजी दिलेल्या तक्रारीनुसार २० सप्टेंबर २०१४ च्या रात्री आरोपी किशोर श्यामराव काळे (३५, रा. गीतानगर, एमराल्ड कॉलनी) याने पत्नीला सांगितले की, तिच्या बहिणीची तब्येत खराब आहे व तिच्या देखभालकरिता भुसावळला तुला जायचे आहे. त्यामुळे पीडितेची आई ही भुसावळ येथे गेली व त्या रात्री पीडित मुलीसह तिच्या दोन लहान बहिणी घरी झोपल्या होत्या. आरोपी किशोर काळे हा रात्री

१२ वाजेच्या सुमारास दारू पिऊन आला व त्याने पीडित मुलीला पाय दाबायला सांगितले. मुलगी पाय दाबत असतानाच, आरोपीने अचानक उठून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. तत्कालीन तपास अधिकारी पीएसआय के. एम. आतराम, पोलिस निरीक्षक प्रकाश आर. सावकार यांनी तपास करून आरोपीविरुध्द दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.सरकार पक्षातर्फे एकूण ११ साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडिता, पीडितेची बहीण व तिची आई यांची साक्ष व पुरावे महत्त्वाचे ठरले, तसेच इतर साक्षीपुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला शिक्षा दिली. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील राजेश आकोटकर यांनी न्यायालयात बाजू मांडली. पैरवी अधिकारी म्हणून एएसआय फझलुर रेहमान काझी व एएसआय श्रीकांत गावंडे यांनी सहकार्य केले. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAkolaअकोला