शहरं
Join us  
Trending Stories
1
हाडे तुटली, आतड्या फाटल्या, अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचा भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट समोर
2
दहशतवाद्यांचा स्लीपर सेल...! मुंब्र्यातून उर्दू शिक्षकाला अटक; अल कायदाशी संबंध, एटीएसला मोठा सुगावा लागला...
3
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
4
एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात होतं वर्चस्व! आता २ लाख कोटी रुपये थकीत; सरकारकडे मदतीसाठी याचना
5
"तुम्हा दोघांना टीम इंडियात खेळायचं असेल तर..." रोहित-विराटला BCCIनी दिली शेवटची 'वॉर्निंग'
6
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
7
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
8
६ हजार तपासणी मोहिमा, २ लाख प्रवाशांवर कारवाई; कोकण रेल्वेने वसूल केला १५ .२१ कोटींचा दंड
9
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
10
IPL 2026 : विराटच्या RCB वर बंगळुरुकरांना निरोप देण्याची वेळ; पुणेकर पाहुणचारासाठी नटले!
11
३० हजारांपेक्षा कमी आहे सॅलरी तरी, SIP द्वारे बनवू शकता १ कोटींचा फंड; महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक?
12
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
13
Accident:पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ!
14
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?
15
Samudra Shastra: नुसत्या हसण्यावरून स्वभाव ओळखता येतो? समुद्र शास्त्रात मिळते उत्तर
16
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
17
Groww IPO Listing: केवळ ५% होता GMP, पण कंपनीची धमाकेदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 'या' शेअरनं दिला २३% पेक्षा जास्त फायदा
18
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाची अपडेट, संशयितांना कार विकणारा डीलर ताब्यात!
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक दहशतवादी डॉक्टर अटकेत; देशभरात छापेमारी सुरू...
20
निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित! एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर १ लाखाहून अधिक पेन्शन मिळवा

अश्विनी बिद्रे खून प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात; सात वर्षांपासून संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 10:03 IST

पोलिसांनी तपास करण्यास चालढकल केल्याने गोरे यांनी ऑक्टोबर २०१६ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागितली.

उद्धव गोडसे कोल्हापूर : सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे यांचे अपहरण झाल्याची फिर्याद मुंबईतील कळंबोली पोलिस ठाण्यात दाखल होऊन शुक्रवारी (दि. १४) सात वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या सात वर्षांत गुन्हा दाखल करण्यापासून ते तपास आणि न्यायालयीन कामकाजासाठी बिद्रे-गोरे कुटुंबीयांना सातत्याने पाठपुरावा करावा लागला. या  खटल्याची सुनावणी आता अंतिम टप्प्यात आहे.

आळते (ता. हातकणंगले) येथील सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे यांचे कळंबोली येथून २०१५मध्ये अपहरण झाले होते. शोध घेऊनही त्या सापडत नसल्याने अखेर त्यांचे पती राजू गोरे यांनी पत्नी बेपत्ता असल्याची फिर्याद कळंबोली पोलिसांत दिली. पोलिसांनी तपास करण्यास चालढकल केल्याने गोरे यांनी ऑक्टोबर २०१६ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागितली. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या गुन्ह्याच्या तपासासाठी एसआयटी नेमण्यात आली. तपास अधिकारी नीलेश राऊत आणि संगीता अल्फान्सो यांनी केेलेल्या तपासात वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय श्यामसुंदर कुुरुंदकर (रा. ठाणे, मूळ कोल्हापूर) याने बिद्रे यांचा खून करून साथीदारांच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी कुुरुंदकर याच्यासह राजू ऊर्फ ज्ञानेश्वर दत्तात्रय पाटील, कुंदन भंडारी आणि महेश पळणीकर या चौघांना अटक केली. 

सात वर्षांचा संघर्षगुन्ह्यातील प्रमुख संशयित आरोपी कुरुंदकर हा पोलिस दलात वरिष्ठ निरीक्षक होता. अनेक बड्या अधिकाऱ्यांशी त्याचे लागेबांधे होते. दुसरा संशयित राजू पाटील हा माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा निकटवर्तीय होता.  

पळणीकरचा कबुलीजबाबकुुरुंदकर याचा मित्र महेश पळणीकर याला पोलिसांनी पुण्यातून अटक केल्यानंतर त्याने बिद्रे यांचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची कबुली दिली.