शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

आशुतोष भाकरेवर सुरू होते मानसोपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 05:22 IST

सुसाईड नोट नाही; महिनाभरापूर्वी आला नांदेडला

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नवोदित कलावंत आशुतोष भाकरे (३२) याच्या आत्महत्या प्रकरणी अद्याप कोणतेही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत़ मोठ्या बॅनरची कामे मिळत नसल्याने त्याला नैराश्य आले होते. त्यामुळे मुंबईत मानसोपचार तज्ज्ञाचा सल्लाही त्याने घेतला होता. उपचार सुरू असतानाच त्याने बुधवारी मृत्यूला कवटाळले. पोलीस अद्याप कुठल्याही निष्कर्षापर्यंत आलेले नाहीत.

‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेली आघाडीची अभिनेत्री मयुरी देशमुख हिचा पती असलेल्या आशुतोषने २९ जुलैला दुपारी येथील राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली़ साडेचार वर्षांपासून तो मुंबई येथेच राहायचा. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मागील महिन्यात तो नांदेडला परतला होता. याबाबत नातेवाइकांनी सांगितले की, गेल्या चार महिन्यांत कोणतेही नवीन काम त्याला मिळालेले नव्हते. यातून काही दिवसांपासून तो नैराश्यात होता. या अनुषंगाने मुंबई येथे मानसोपचार तज्ज्ञाकडून सल्ला घेण्यात आला होता. त्यानुसार उपचारही सुरू होते. आशुतोषने ‘विचार ठरला पक्का’, ‘भाकर’ या चित्रपटात काम केले होते़ तसेच शॉर्टफिल्ममध्येही त्याची भूमिका होती़

आकस्मिक मृत्यूची नोंदया प्रकरणी आकस्मिक मृत्यू म्हणून शिवाजीनगर पोलिसांनी नोंद घेतली आहे. कसलीही सुसाईड नोट सापडलेली नाही. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात आशुतोष हा गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होता, एवढीच माहिती कुटुंबीयांकडून मिळाल्याचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी सांगितले.

टॅग्स :Suicideआत्महत्या