शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

Aryan Khan Drug Case: ड्रग पार्टीतील तो दाढीवाला माफिया कोण? नवाब मलिकांनी केलेला दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 15:58 IST

Nawab Malik target Kashif khan, Sameer Wankhede: दाढीवाल्या व्यक्तीला मलिक यांनी एक आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया म्हटले होते. त्याच्याशी संबंध असल्याने क्रूझवर तो असूनही समीर वानखेडे यांनी त्याला अटक केली नाही तसेच त्याची चौकशीही केली गेली नाही, असा आरोप मलिक यांनी केला होता.

महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Nawab Malik ) यांनी काल काही मोजक्या लोकांवर कारवाई करण्यात आली, क्रूझवरील अन्य लोकांना चौकशी न करता सोडून देण्यात आल्याचा आरोप केला होता. याचवेळी त्या क्रूझवर एक दाढीवाला आंतरराष्ट्रीय ड्रग स्मगलर आपल्या प्रेयसीसोबत नाचत होता, तो एनसीबीचे समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचा मित्र असल्याचा दावा त्यांनी केला होता. हा दाढीवाला कोण होता, त्याचा खुलासा मलिक यांनी आज केला आहे. 

मलिक यांनी आज फॅशन टीव्ही इंडियाचा एमडी काशिफ खान (Kashif khan) याचे नाव घेतले. या काशिफ खानवर देशभरात अनेक गुन्हे दाखल आहेत, त्या काशिफ खानची दाढी कोणाला दिवस नाहीय का? असा सवाल मलिक यांनी केला आहे. मलिक यांना अप्रत्यक्षरित्या कालचा तो दाढीवाला म्हणजे काशिफ खान असल्याचे म्हणायचे होते. याबाबतचे वृत्त एनबीटीने दिले आहे. 

दाढीवाल्या व्यक्तीला मलिक यांनी एक आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया म्हटले होते. त्याच्याशी संबंध असल्याने क्रूझवर तो असूनही समीर वानखेडे यांनी त्याला अटक केली नाही तसेच त्याची चौकशीही केली गेली नाही. या क्रूझवरील पार्टीबाबत कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नव्हती. एनसीबी काशिफ खानवर कारवाई का करत नाहीय, असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला. 

या ड्रग माफियाच्या गर्लफ्रेंडकडे पिस्तूल देखील होती. तो एकेकाळी तिहार जेलमध्ये होता. समीर वानखेडेंनी त्याच्यावर कारवाई केली नाही आणि त्याला जाऊ दिले. अन्य लोकांना अटक केल्याचा आरोप मलिक यांनी केला. समीर वानखेडेंनी त्याच्या नाचण्याचे सीसीटीव्ही फुटेज दिले नाही तर आम्ही ते देऊ. एनसीबीला आता हा दाढीवाला कोण होता हे सांगावे लागेल. कोणत्या देशाचा आहे ते देखील सांगावे लागेल. जर त्याला या प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतले नाही तर आम्हाला वाटेल की पूर्ण एनसीबीच भ्रष्ट आहे, असेही मलिक म्हणाले होते. 

टॅग्स :nawab malikनवाब मलिकSameer Wankhedeसमीर वानखेडेNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोMumbai Cruise Drugs Caseमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी