शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

NCB वर करण्यात येणाऱ्या आरोपांशी आमचा संबंध नाही; कोणताही पैशाचा व्यवहार झालेला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 15:15 IST

Aryan Khan Bail : आर्यन खानच्या वकिलांनी अतिरिक्त प्रतिज्ञापत्र केले दाखल

ठळक मुद्देसुनावणीदरम्यान आर्यन खानच्या वतीने एनसीबीवरील व्यवहारांच्या आरोपांशी आपला काहीही संबंध नसल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच प्रभाकर साईलच्या प्रतिज्ञापत्राचा आणि त्यानं केलेल्या आरोपांचा जामीनाशी काहीही संबंध नसल्याचा दावा या प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील महत्त्वपूर्ण सुनावणी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुरू झाली. आर्यन खानच्या वतीने न्यायालयात अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे, या अतिरिक्त प्रतिज्ञापत्रामध्ये एनसीबीच्या अधिकाऱ्यांशी त्याच्या बाजूने कोणताही व्यवहार झाला नसल्याचे म्हटले आहे. हा सर्व राजकीय लोक आणि एनसीबीमधील मामला आहे. तसेच प्रभाकर साईलच्या प्रतिज्ञापत्राचा आणि त्यानं केलेल्या आरोपांचा जामीनाशी काहीही संबंध नसल्याचा दावा या प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे.

सुनावणीदरम्यान आर्यन खानच्या वतीने एनसीबीवरील व्यवहारांच्या आरोपांशी आपला काहीही संबंध नसल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. प्रभाकर साईल किंवा किरण गोसावी यांनाही ते ओळखत नसल्याचेही सांगण्यात आले आहे. आर्यनच्या वतीने दिलेल्या प्रतिज्ञापत्रात प्रभाकर साईल माहीत नाही किंवा त्याच्याशी कोणताही संबंध नसल्याचेही म्हटले आहे. हे वेगळे प्रकरण आहे. मी एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर कोणताही आरोप केलेला नाही.

आर्यन खानच्या वतीने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे. एनसीबीच्या अधिकार्‍यांशी त्यांच्या बाजूने कोणताही व्यवहार झाला नसल्याचे त्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. हा सगळा राजकीय लोक आणि एनसीबी यांच्यातील मामला आहे. प्रतिज्ञापत्रात आर्यन खानने पुनरुच्चार केला आहे की, त्याच्याकडून कोणतेही ड्रग्ज जप्त करण्यात आले नाही किंवा त्याने ते सेवन केले नाही. क्रूझ टर्मिनलवर त्याच्या उपस्थितीदरम्यान याचा कोणताही पुरावा सापडला नाही.आर्यन खानच्या वतीने या प्रतिज्ञापत्रात या प्रकरणातील आरोप आणि प्रत्यारोप बाजूला ठेवून गुणवत्तेच्या आधारे त्याच्या जामीन अर्जावर निर्णय घेण्यात यावा, असे म्हटले आहे.  त्याचवेळी आर्यन खानच्या जामीन अर्जावर एनसीबीने न्यायालयात उत्तर दाखल केले आहे. एनसीबीने जामीन अर्जाला तीव्र विरोध केला आहे, एनसीबीने म्हटले आहे की, शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीने पंच साक्षीदारावर प्रभाव टाकल्याचे दिसते. जामीन अर्ज फेटाळण्यासाठी केवळ ही एक गोष्ट कारण ठरू शकते.

 

 

 

टॅग्स :Aryan Khanआर्यन खानNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोHigh Courtउच्च न्यायालयadvocateवकिल