शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

Aryan Khan Drug Case: आर्यनला जामीन मिळाला, इतर 2 लाख जणांचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 06:31 IST

न्या. मदन लोकुर यांचा सवाल : न्यायव्यवस्थेत आमूलाग्र बदलांची आवश्यकता

- खुशालचंद बाहेतीलाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई उच्च न्यायालयानेआर्यन खानच्या जामीन अर्जाला दिलेल्या प्राधान्यक्रमाबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. मदन लोकुर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. २ लाख प्रलंबित जामीन अर्जांचे काय, हे विचारतानाच न्याय व्यवस्थेत आमूलाग्र बदलांची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 

३ ऑक्टोबर रोजी बॉलीवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यास एनडीपीएस कायद्यातील गुन्ह्यात अटक झाली. मेट्रोपोलीटन मॅजीस्ट्रेट व एनडीपीएस विशेष न्यायालय या २ न्यायालयांनी जामीन फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्जाची ३ दिवस सुनावणी होऊन २८ ऑक्टोबर रोजी त्याला जामीन मंजूर झाला. उच्च न्यायालयातील सुनावणीच्या वेळी सुनावणीच्या प्राधान्य क्रमाला आक्षेप घेणारा हस्तक्षेप अर्जही दाखल झाला होता.

एका कार्यशाळेत बोलताना सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. मदन लोकुर म्हणाले, आर्यन खानचा जामीन चर्चेचा विषय आहे. त्याला जामीन मिळाला ही चांगली गोष्ट आहे. पण देशाच्या न्यायालयात प्रलंबित असलेल्या अशाच प्रकारच्या २ लक्ष अर्जांचे काय? हा प्रश्नच आहे.मी आज सकाळीच पाहिले २८ लक्ष अशी प्रकरणे प्रलंबित आहेत , ज्यात आरोपी फरार आहेत. या प्रत्येक खटल्यात फक्त १ आरोपी आहे, असे समजले तरी २८ लाख आरोपी फरार आहेत. न्यायव्यवस्था याबद्दल काय करीत आहे? २२ लक्ष साक्षीदार असे आहेत जे न्यायालयात येत नाहीत व यामुळेच खटल्यात तारीख पे तारीख द्यावी लागते. याबद्दल काय करणार? कनिष्ठ न्यायालयात २ कोटी ९५ लक्ष खटले प्रलंबित आहेत, हे कसे निकाली काढणार? न्यायालयीन सुधारणांची वेळ गेली आहे. आता संपूर्ण न्यायव्यवस्थेत संपूर्ण व आमूलाग्र बदल गरजेचे आहे, असे मत न्या. मदन लोकुर यांनी व्यक्त केले.

न्यायालयात प्रलंबित जामिनासाठीचे अर्ज २ लक्ष पेक्षा जास्त. खटल्यातील फरार आरोपी २८ लक्ष २२ लक्ष साक्षीदाराअभावी तारीख पे तारीख.  कनिष्ठ न्यायालयात प्रलंबित खटले २ कोटी ९५ लक्ष 

सॅम डिसोझा यांचा अर्जपूजा ददलानी व किरण गोसावी यांच्यामध्ये ५० लाखाची मध्यस्थी करणाऱ्या सॅम डिसोझा यांनी बुधवारी सरकारच्या एसआयटीकडून संभाव्य अटकेविरुद्ध संरक्षण मागणारा अर्ज उच्च न्यायालयात दाखल केला आहे. मात्र त्याचा अर्ज फेटाळण्यात आला आहे.

टॅग्स :Aryan Khanआर्यन खानCourtन्यायालयMumbai Cruise Drugs Caseमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी