शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Aryan Khan Drug Case: आर्यन खान: गोसावी-पूजा दादलानीच्या भेटीचे फुटेज एसआयटीच्या हाती; अडचणी वाढल्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 09:08 IST

Aryan Khan Drug Case: एनसीबीने २ ऑक्टोबरला कार्डेलिया  क्रुझवर छापा टाकून आर्यन खानसह ८ जणांना अटक केली होती. या प्रकरणातील साक्षीदार असलेला प्रभाकर साईल याने मोठे आरोप केले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्याशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात २५ कोटींच्या खंडणीच्या आरोपप्रकरणी तपास करत असलेल्या मुंबई पोलिसांच्या हाती पुरावा सापडला आहे. या कारवाईच्या रात्री लोअर परळ परिसरात शाहरुख खानची मॅनेजर पूजा दादलानी ही वादग्रस्त पंच किरण गोसावी याला भेटल्यासंदर्भातील सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. विशेष तपास पथकाकडून त्याची छाननी केली जात असून, लवकरच पूजाकडे याबाबत चौकशी करणार असल्याचे सांगण्यात आले.

एनसीबीने २ ऑक्टोबरला कार्डेलिया  क्रुझवर छापा टाकून आर्यन खानसह ८ जणांना अटक केली होती. या प्रकरणातील साक्षीदार असलेला प्रभाकर साईल याने आर्यन खानला सोडविण्यासाठी  किरण गोसावी, सॅम डिसुझा व पूजा दादलानी यांच्यात २५ कोटींची ‘बोलणी’ झाली होती. त्यात १८ कोटींमध्ये ‘डील’ झाली होती. त्यातून ८ कोटी रुपये समीर वानखेडे यांना दिले जाणार होते, मात्र हा सौदा पूर्ण झाला नाही, अशी कबुली दिली होती. त्यासाठी लोअर परळ येथे तिघे भेटले होते, वानखेडे यांनी साक्षीदार म्हणून माझ्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या होत्या, असा जबाब दिला आहे.

साईलच्या आरोपामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले. त्यामुळे याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून एसआयटी स्थापन केली. सहाय्यक  आयुक्त मिलिंद खेतले यांच्या नेतृत्वाखाली चारजणांची टीम तपास करत आहे. त्यांना एक सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे, त्यामध्ये मुंबईच्या लोअर परळमध्ये पूजा दादलानीची कार दिसून आली आहे. याठिकाणी तिची गोसावी व सॅम डिसुझाबरोबर भेट झाली होती. 

 

टॅग्स :Aryan Khanआर्यन खानMumbai Cruise Drugs Caseमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी