शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Aryan Khan Drugs Case : आर्यनला जामीन, आज सुटका; हायकोर्टाचा दिलासा, २६ दिवसांनंतर येणार घरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 06:54 IST

Aryan Khan Drugs Case: न्यायमूर्ती सांबरे यांनी आर्यनबरोबरच अरबाझ मर्चंट व मूनमून धमेचा यांचाही जामीन मंजूर केला. मात्र, त्यासाठी काही अटी कोर्टाने घातल्या असून, सविस्तर आदेश शुक्रवारी दिला जाणार आहे.

मुंबई : ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी गेल्या २६ दिवसांपासून आर्थर रोड तुरुंगामध्ये असलेल्या आर्यन खानचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने गुरुवारी मंजूर केला. त्यामुळे त्याचे वडील बॉलीवूड सुपरस्टार शाहरूख खान यांना दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे या प्रकरणावरून सुरू असलेली आरोप-प्रत्यारोपांची मालिका कायम असून ‘अभी पिक्चर बाकी है,’ असे म्हणत अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे समीर वानखेडे यांना पुन्हा एकदा आव्हान दिले आहे.

न्यायमूर्ती सांबरे यांनी आर्यनबरोबरच अरबाझ मर्चंट व मूनमून धमेचा यांचाही जामीन मंजूर केला. मात्र, त्यासाठी काही अटी कोर्टाने घातल्या असून, सविस्तर आदेश शुक्रवारी दिला जाणार आहे. त्यामुळे आर्यनला गुरुवारची रात्र तुरुंगातच काढावी लागली. एनसीबीतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी आर्यन  व अन्य दोघांच्या जामिनाला विरोध केला. आर्यन ड्रग्जचे नियमित सेवन करतो आणि त्याला ते पुरविले जाते, त्यासंदर्भात आमच्याकडे पुरावे आहेत. रचलेला कट सिद्ध करणे कठीण असते; कारण ते फक्त कट रचणाऱ्यांनाच माहीत असते, असा युक्तिवाद सिंग यांनी केला. 

युक्तिवादात आर्यनच्या वकिलांनी आर्यनकडून कोणतेही ड्रग्ज एनसीबीने ताब्यात घेतले नसल्याच्या मुद्द्याकडे कोर्टाचे लक्ष वेधले. त्याच्याबरोबर असणाऱ्या इतर पाच जणांनी सोबत काय घेतले होते, याच्याशी आर्यनचा काय संबंध? त्या क्रूझवर १३०० लोक होते, मग सगळेच या कटात सहभागी होते असे म्हणायचे काय, असे सवाल करीत कट केल्याचे चुकीचे कलम लावल्याचा युक्तिवाद केला.

टॅग्स :Aryan Khanआर्यन खानMumbai Cruise Drugs Caseमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी