शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

Aryan Khan Drug Case: आर्यन खान प्रकरणात मोठा गौप्यस्फोट! सुनिल पाटील कोण? राजकारणी व सनदी अधिकाऱ्यांच्या संपर्कात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 08:30 IST

Aryan Khan Drug Case: सॅम डिसोझाने सोमवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही कबुली दिली. किरण गोसावीसमवेत शाहरुख खानची मॅनेजर पूजा दादलानीशी परळ येथे भेटल्याचे तो म्हणाला.

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : क्रूझवरील कारवाईतून आर्यन खानला वाचविण्यासाठी मी किरण गोसावीसमवेत शाहरुख खानची मॅनेजर पूजा दादलानीशी परळ येथे भेटलो होतो, मात्र गोसावी हा खोटारडा असल्याने त्यांची सेटलमेंट होऊ शकली नाही, अशी कबुली सॅम डिसोझा याने दिली. डिसोझाने सोमवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही कबुली दिली. 

मंत्री नवाब मलिक आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी या प्रकरणात सॅम डिसोझावर आरोप केले आहेत. तो या व्यवहारात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगितले. त्याबाबत डिसोझा म्हणाला की, माझे या प्रकरणाशी काही घेणे-देणे नाही. मला सुनील पाटील या व्यक्तीचा कॉल आला. तो राजकारणी व सनदी अधिकाऱ्यांच्या संपर्कात असतो. त्याने आपण अहमदाबादमध्ये असून त्याला क्रूझ ड्रग्ज पार्टीसंबंधी काहीतरी महत्त्वाची माहिती असून एनसीबीशी संपर्क साधायला सांगितले होते. त्यानंतर मला किरण गोसावीचा कॉल आल्याचा खुलासा डिसुझाने केला आहे.

मला या प्रकरणात पडायचे नव्हते, त्यामुळे मी काही अधिकाऱ्यांचा संपर्क त्याला दिला. नंतर त्यांच्यामध्ये यासंबंधी काही बोलणे झाले. त्यानंतर  साडेआठच्या सुमारास या पार्टीसंबंधी काही अपडेट येणार असल्याचा कॉल आला. त्यावेळी आपण पहिल्यांदा किरण गोसावीला भेटलो. त्यानंतर मला सुनील पाटीलचा कॉल आला आणि यामध्ये कोण सेलिब्रेटीचा मुलगा आहे, ते चेक करायला सांगितले. त्यावेळी गोसावीने आर्यनचे नाव सांगून त्याच्याजवळ कोणतेही ड्रग्ज नसल्याने त्याला मदत करण्यास सांगितले. त्यावेळी यामध्ये मध्यस्थी करण्याचे मान्य केले. त्यानंतर परळजवळ पूजाला भेटलो, पण त्यावेळी त्यांच्यात काय बोलणे झाले, हे माहीत नाही. पण गोसावी हा फ्रॉड असल्याचे स्पष्ट झाल्याने पुढे काही व्यवहार झाला नाही. 

टॅग्स :Aryan Khanआर्यन खानMumbai Cruise Drugs Caseमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी