शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

Munmun Dhamecha: ड्रग्जप्रकरणी आर्यन खान सुटला; मुनमुन धमेचा मात्र कारागृहातच अडकली, जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 08:57 IST

Munmun Dhamecha still in Jail: कार्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात विशेष एनडीपीएस कोर्टाने शनिवारी एकूण नऊ जणांना जामीन दिला. त्यात, आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंट यांना ड्रग्ज पुरविण्याचा आरोप असलेल्या अर्चित कुमारचाही समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : क्रुझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी अटक आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांची शनिवारी सुटका करण्यात आली. ऑर्थर रोड कारागृहातून हे दोघेही आपापल्या घरी रवाना झाले. परंतु, याच प्रकरणात अटक करण्यात आलेली मुनमुन धमेचा ही मात्र अद्याप तुरुंगातच आहे. मुनमुन धमेचा ही मध्य प्रदेशची आहे. त्यामुळे तिला जामीनदार मिळविण्यासाठी अडचणी येत आहेत. तसेच कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे तिला शनिवारची रात्र कारागृहातच काढावी लागली आहे. 

तर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी मुनमुनच्या वकिलांना सुटीकालीन न्यायालयामोर हा अर्ज सादर करण्यास सांगितले आहे. याआधी उच्च न्यायालयात झालेल्या युक्तिवादावेळी मुनमुनचे वकील अली काशिफ खान देशमुख यांनी तिला झालेली अटक बेकायदा असल्याचा दावा केला होता. रविवारी ती कारागृहाबाहेर पडू शकते.

कार्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात विशेष एनडीपीएस कोर्टाने शनिवारी एकूण नऊ जणांना जामीन दिला. त्यात, आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंट यांना ड्रग्ज पुरविण्याचा आरोप असलेल्या अर्चित कुमारचाही समावेश आहे. त्याच्यासह, एनडीपीएस कोर्टाचे विशेष न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी गोमित चोप्रा, नुपूर सतिजा, समीर सहगल, गोपाळजी आनंद, मानव सिंघल, भास्कर अरोरा, इश्मित सिंग चढ्ढा, श्रेयस नायर यांनाही जामीन देण्यात आला.

या आरोपींना जामीन मंजूर करताना रोख रकमेच्या जामिनावर सुटका करण्याची विनंतीही न्यायाधीशांनी मान्य केली. आतापर्यंत एकूण २० आरोपींपैकी १४ जणांना जामीन मंजूर झाला आहे.एनडीपीएस कोर्टाचे विशेष न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी क्रूझवरील परतीच्या प्रवासानंतर ४ ऑक्टोबर रोजी एनसीबीने अटक केलेल्या अविन साहू व मनीष राजगढिया यांना जामीन यापूर्वीच मंजूर केला होता, तर गुरुवारी मुंबई हायकोर्टाने आर्यन खान, अरबाझ मर्चंट व मुनमुन धमेचा यांना जामीन मंजूर केला होता. त्यामुळे या प्रकरणात एनसीबीने अटक केलेल्या एकूण २० आरोपींपैकी ११ आरोपींना आतापर्यंत जामीन मिळाला आहे. विक्रांत छोकर, मोहक जस्वाल, अब्दुल कादीर शेख, शिवराज हरिजन आणि दोन नायजेरियन नागरिक अजूनही याप्रकरणी अटकेत आहेत.

टॅग्स :Aryan Khanआर्यन खानMumbai Cruise Drugs Caseमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी