शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Aryan Khan Drug Case Bail: आर्यन खानची घरवापसी; २८ दिवसांनी कारागृहाबाहेर, ‘मन्नत’वर फटाक्यांची आतषबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 08:01 IST

Aryan Khan Drug Case Bail: क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीने २ ऑक्टोबर रोजी आर्यनला अटक केली. गुरुवारी त्याला जामीन मंजूर झाला. जामिनाची प्रत कारागृहात वेळेवर न पोहोचल्याने शुक्रवारची रात्रही त्याला कारागृहातच काढावी लागली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बॉलिवूड किंग शाहरूख खानचा मुलगा आर्यन २८ दिवसांनी शनिवारी आर्थर रोड कारागृहाबाहेर आला. आर्यन ‘मन्नत’वर पोहोचताच तेथेही फटाक्यांच्या आतषबाजीत त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले.

क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीने २ ऑक्टोबर रोजी आर्यनला अटक केली. गुरुवारी त्याला जामीन मंजूर झाला. जामिनाची प्रत कारागृहात वेळेवर न पोहोचल्याने शुक्रवारची रात्रही त्याला कारागृहातच काढावी लागली. शनिवारी पहाटे कारागृह प्रशासनाने जामीन पत्रपेटी उघडली. त्यानंतर सकाळी ११ वाजता आर्यन कारागृहातून बाहेर पडला. आर्यन कारागृहाबाहेर येताच शाहरूखची कार त्याला घेण्यासाठी पुढे आली. तेथून पोलिसांच्या बंदोबस्तात गाडी ‘मन्नत’च्या दिशेने रवाना झाली. यावेळी चाहत्यांच्या गर्दीमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. चाहत्यांनी ‘मन्नत’बाहेरही गर्दी केली होती. 

साईल, गोसावीच्या जबाबाविनाच समिती दिल्लीला आर्यन खानवरील कारवाई टाळण्यासाठी २५ कोटींच्या लाचेची मागणी केल्याच्या आरोपांच्या चौकशीसाठी मुंबईला आलेली उच्चस्तरीय चौकशी समिती शनिवारी दिल्लीला रवाना झाली. एनसीबीवर आरोप करणारे पंच प्रभाकर साईल व वादग्रस्त साक्षीदार किरण गोसावी यांची चौकशी न करताच ते माघारी परतले. ही समिती अहवाल एनसीबीचे महासंचालक एस. बी. प्रधान यांच्याकडे सुपुर्द करणार आहे.चौकशी समितीने मुंबईत बुधवारी समीर वानखेडे यांच्याकडे सुमारे साडेचार तास चौकशी करून जबाब नोंदविला. मात्र फरारी गोसावीला पुणे पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतल्याने त्याचा जबाब समितीला घेता आला नाही, तर साईलला कायदेशीर पद्धतीने समन्स न बजावल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला. त्यामुळे तो जबाब नोंदविण्यासाठी हजर झाला नसल्याचे सांगितले.

विशेष न्यायालयाकडून नऊ आरोपींना जामीनविशेष एनडीपीएस कोर्टाने शनिवारी एकूण नऊ जणांना जामीन दिला. त्यात, आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंट यांना ड्रग्ज पुरविण्याचा आरोप असलेल्या अर्चित कुमारचाही समावेश आहे. त्याच्यासह, एनडीपीएस कोर्टाचे विशेष न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी गोमित चोप्रा, नूपुर सतिजा, समीर सहगल, गोपाळजी आनंद, मानव सिंघल, भास्कर अरोरा, इश्मित सिंग चढ्ढा, श्रेयस नायर यांनाही जामीन देण्यात आला.आतापर्यंत एकूण २० आरोपींपैकी १४ जणांना जामीन मंजूर झाला आहे. विक्रांत छोकर, मोहक जस्वाल, अब्दुल कादीर शेख, शिवराज हरिजन आणि दोन नायजेरियन नागरिक अजूनही अटकेत आहेत.

टॅग्स :Aryan Khanआर्यन खानMumbai Cruise Drugs Caseमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टीNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो