शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात आगमन मिरवणुकीने वाहतूक कोंडी; दोन गणेश मंडळावर गुन्हे दाखल

By सदानंद नाईक | Updated: September 15, 2023 16:03 IST

उल्हासनगरात गणेशोत्सवानिमित्त सार्वजनिक गणेश मंडळाच्या आगमन मिरवणूका सुरू झाल्या आहेत. 

उल्हासनगर : उल्हासनगर मित्र मंडळ व निक्की फ्रेंड सर्कल गणेश मंडळ यांनी काढलेल्या आगमन मिरवणुकी मुळे शहरात वाहतूक कोंडी झाली. याची दखल उल्हासनगर पोलिसांनी घेऊन दोन्ही मंडळाच्या अध्यक्षावर गुन्हे दाखल झाले. उल्हासनगरात गणेशोत्सवा निमित्त सार्वजनिक गणेश मंडळाच्या आगमन मिरवणूका सुरू झाल्या आहेत. 

१२ सप्टेंबर रोजी उल्हासनगरचा राजा म्हणून ओळख असलेल्या उल्हासनगर मित्र मंडळानेढोलताशेच्या गजरात वाहतगाजत आगमन मिरवणूक काढली. या मिरवणुकीमुळे शहरात काही तास वाहतूक कोंडी निर्माण झाली. विनापरवाना आगमन मिरवणूक काढल्याचा ठपका उल्हासनगर पोलिसांनी मंडळाचे अध्यक्ष महेंद्रसिंग हुद्दासिंग लबाना यांच्यावर गुन्हा दाखल केला. 

दुसऱ्या घटनेत निक्की फ्रेंड सर्कल गणेश मित्र मंडळाने बुधवार १३ सप्टेंबर रोजी गणेश आगमन मिरवणूक ढोलताशेच्या गजरात काढल्याने, शहरातील सी ब्लॉक, गोलमैदान आदी परिसरात वाहतूक कोंडी केल्याचा ठपका उल्हासनगर पोलिसांनी ठेवून मंडळाचे अध्यक्ष नितीन उर्फ घनश्यामदास रहाटा यांच्यावर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी