शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

बोलण्यात गुंतवून हातचालाखीने फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक, लाखोंचे दागिने हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 15:13 IST

गुन्हे शाखेची कारवाई, ८ गुन्ह्यांची उकल

मंगेश कराळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा: बोलण्यात गुंतवून हातचालाखीने फसवणुक करणाऱ्या सराईत दुकलीला गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी अटक केली आहे. या दोन्ही आरोपीकडून पोलिसांनी ८ गुन्ह्यांची उकल केली असून चोरीचे १० लाख रुपये किंमतीचे १६६ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी सोमवारी दिली आहे.

विरार येथील साईनाथ नगरच्या प्लाझा इमारतीत राहणारे रामचंद्र कृष्ण बिरंगोळे (६५) हे १८ ऑगस्टला सकाळी साडेअकराच्या सुमारास साईबाबा मंदिरासमोर, फुलपाडा रोड येथे उभे होते. त्यावेळी तुम्ही चहा पिता का असे विचारुन व  पाया पडून दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या गळ्यातील १० ग्रॅम वजनाची ४० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन काढून घेतली होती. विरार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. पोलीस आयुक्तालय परिसरात गेल्या काही महिन्यापासून बतावणी/ फसवणुकीचे प्रकारात वाढ झाल्याने वरिष्ठांनी गांभिर्याने दखल घेवुन आरोपीचा शोध घेवुन पायबंद करण्याच्या सुचना दिल्या होत्या.    दिलेल्या सुचना व आदेशान्वये गुन्हयाचा तपास गुन्हे शाखा युनिट तीनकडे देण्यात आला. गुन्हयाचा तांत्रिक विश्लेषण व माहिती प्राप्त करुन आरोपी रमेश ऊर्फ रम्या विजयकुमार जैसवाल (४६) आणि विशाल ऊर्फ बल्ला ऊर्फ बाळू विष्णू कश्यप (२८) या दोघांना ताब्यात घेऊन तपास केल्यावर गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्याने २६ ऑगस्टला अटक केली. आरोपीकडे पोलीस कोठडीत दरम्यान फसवणुक केलेले १० लाख रुपये किंमतीचे १६६ ग्रॅम सोन्याचे दागिने व इतर मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपींकडून पोलीस आयुक्तालय, मुंबई, ठाणे येथील ८ गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपी विरुध्द अशाच प्रकारे मुंबई, ठाणे शहर, मिरा भाईंदर- वसई विरार आयुक्तालय येथे ५० पेक्षा जास्त गुन्हे नोंद आहेत. दोन्ही आरोपी विरारच्या पोलीस कोठडीमध्ये आहे. 

वरील कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, अभिजित टेलर, पोलीस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, मुकेश तटकरे, सचिन घेरे, सागर बारवकर,  मनोज सकपाळ, अश्विन पाटील, राकेश पवार, सुमित जाधव,  सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, म.सु.ब सागर सोनवणे, प्रविण वानखेडे, गणेश यादव तसेच सायबर सेलचे संतोष चव्हाण यांनी केली आहे.

टॅग्स :nalasopara-acनालासोपाराArrestअटक