शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूक करणाऱ्या बिल्डरला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 23:28 IST

जवळपास १४ महिने फरार असलेल्या आनंद कदमला गुन्हे शाखेने बुधवारी घोडबंदरमधून अटक केली आहे.

नवी मुंबई : कमी किमतीमध्ये घर देण्याचे आमिष दाखवून ५०० पेक्षा जास्त ग्राहकांची फसवणूक करणाºया बिल्डरविरोधात एका वर्षापूर्वी वाशीमध्ये गुन्हा दाखल केला होता. जवळपास १४ महिने फरार असलेल्या आनंद कदमला गुन्हे शाखेने बुधवारी घोडबंदरमधून अटक केली आहे.

रिलायन्स कन्स्ट्रक्शन व रियल बिल्डकॉन इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीचे संचालक आनंद कदम व पत्नी कविता कदम यांनी कर्जतमधील कोंठिबे येथे लिबर्टी हॉरिजन व टेन स्क्वेअर या नावाने व अलिबाग येथे मीरा आणि कर्जतमधील बेंडसे येथे कोरल लेक हे प्रकल्प सुरू करत असल्याची जाहिरात केली होती. मी किमतीमध्ये घर देण्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून बुकिंगसाठी पैसे घेण्यास सुरुवात केली होती. ५०० पेक्षा जास्त ग्राहकांनी करोडो रुपये त्याच्याकडे जमा केले; परंतु प्रत्यक्षात प्रकल्प न उभे करता त्याने सर्वांची फसवणूक केली होती. त्याच्याविरोधात जून २०१८ मध्ये वाशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याने अ‍ॅस्पायर होम्स फायनान्स कंपनीकडूनही करोडो रुपये घेऊन त्यांचीही फसवणूक केली होती. त्या प्रकरणी दादर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता.गुन्हा दाखल झाल्यापासून आनंद कदम फरार होता. नवी मुंबई गुन्हे शाखेचे उपआयुक्त प्रवीण पाटील, सहायक आयुक्त अजय कदम, आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्याम शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक अतुल लंबे यांनी या आरोपीचा शोध सुरू केला होता. २७ आॅगस्टला घोडबंदरमधून त्याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहनच्संबंधित कंपनीने कोणाची फसवणूक केली असेल तर त्यांनी गुन्हे शाखा कक्ष-१ शी संपर्क साधावा, नागरिकांनी कमी किमतीमध्ये घर देण्याचे आमिष दाखविल्यानंतर तत्काळ विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.