शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या देवगिरी एक्स्प्रेसमध्ये सशस्त्र दरोडेखोरांचा धुमाकूळ; ८ आरोपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 06:14 IST

१५ प्रवाशांना लुटले: दाेन अल्पवयीन मुलांसह आठ जण ताब्यात, कसारा स्थानक सोडल्यानंतर आठ तरुण एक्स्प्रेसच्या बोगी क्रमांक एस-१ आणि एस-२ मध्ये शिरले. हे सर्व तरुण नशेत दंग होते. त्यांनी डब्यात गोंधळ घालायला सुरुवात केली.

कल्याण : नांदेडहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमध्ये आठ ते दहा दरोडेखोरांनी चाकू आणि ब्लेडचा धाक दाखवत दहा ते पंधरा प्रवाशांना लुटल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. देवगिरी एक्स्प्रेसने कसारा स्टेशन सोडल्यानंतर या दरोडेखोरांनी तासभर डब्यामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला. रेल्वे प्रवाशांनी रेल्वे नियंत्रण कक्षाला माहिती देताच कल्याण रेल्वे पोलिसांनी तत्काळ कल्याण रेल्वेस्थानकावर सापळा रचून आठ दरोडेखोरांना बेड्या ठोकल्या. त्यामध्ये दाेन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले आहे.

अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे रोहित जाधव, विलास लांडगे, कपिल ऊर्फ प्रकाश निकम, करण वाहने, राहुल राठोड, नीलेश चव्हाण अशी आहेत. दोन अल्पवयीन मुलांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली. मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास देवगिरी एक्स्प्रेसने कसारा स्थानक सोडल्यानंतर आठ तरुण एक्स्प्रेसच्या बोगी क्रमांक एस-१ आणि एस-२ मध्ये शिरले. हे सर्व तरुण नशेत दंग होते. त्यांनी डब्यात गोंधळ घालायला सुरुवात केली.

प्रवाशांनी दाखविले धाडसया तरुणांनी धारदार शस्त्र दाखवत प्रवाशांच्या वस्तू आणि पैसे हिसकावून घेतले. ज्या प्रवाशांनी विरोध केला त्यांना मारहाण केली. हा सर्व प्रकार धावत्या एक्स्प्रेसमध्ये जवळपास एक तास सुरू होता. काही धाडसी प्रवाशांनी कल्याण रेल्वे नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती दिली. कल्याण रेल्वे पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकेश ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक स्थानकात पोहोचले. ही गाडी फक्त दोन ते तीन मिनिटे कल्याण स्थानकावर थांबते. या कालावधीत रेल्वे पोलिसांनी लूट करणाऱ्या सहा तरुणांना ताब्यात घेतले. 

सर्व आरोपी औरंगाबादचेएक्स्प्रेस ठाण्याच्या दिशेने रवाना झाली, तेव्हा कल्याण रेल्वे पोलिस ट्रेनमध्ये होते. इतर आरोपींना ठाणे आणि दादरपर्यंत ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास सुरू आहे. या सर्व आरोपींना कल्याण रेल्वे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून, औरंगाबादचे रहिवासी आहेत. त्यांनी आतापर्यंत किती गुन्हे केले आहेत, याचा तपास सुरू आहे.